पिकअप-दुचाकीच्या धडकेत एक जण ठार तर दोघे जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:25 IST2021-01-10T04:25:39+5:302021-01-10T04:25:39+5:30
पोखरी गावाजवळ जामखेडकडून नगरमार्गे जात असलेल्या पिकअपने मोटारसायकलला धडक दिली. यात दोन्ही वाहनांची अशी अवस्था झाली होती. ...

पिकअप-दुचाकीच्या धडकेत एक जण ठार तर दोघे जखमी
पोखरी गावाजवळ जामखेडकडून नगरमार्गे जात असलेल्या पिकअपने मोटारसायकलला धडक दिली. यात दोन्ही वाहनांची अशी अवस्था झाली होती. ०९बीईडीपी-०३ आणि ०९बीईडीपी-०४,
कानिफ भीमराव वांढरे ९बीईडीपी-०४
आष्टी : तालुक्यातील पांढरी येथील कानिफ भीमराव वांढरे (वय ३८ वर्षे) हे आपल्या पांढरी गावाकडून घरी जात असताना पोखरी गावाजवळ पिकअप दुचाकीच्या धडकेत ते ठार झाले तर त्यांची पत्नी व मुलगी या गंभीर जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री ११ च्या सुमारास घडली आहे.
आष्टी तालुक्यातील पांढरी येथील कानिफ वांढरे यांचा कुक्कुटपालन व्यवसाय असून ते दुचाकी क्र. एमएच २३ एपी ५१८० वरून आपल्या गावाकडून पोखरी येथील त्यांच्या कुक्कुटपालन व्यवसायकडे जात होते. पोखरी गावाजवळ जामखेडकडून नगरमार्गे जात असलेल्या पिक अप क्र. एमएच १४ व्ही ९०१९ च्या धडकेत कानिफ वांढरे हे ठार झाले. घटनास्थळी ग्रामस्थानी व नातेवाइकांनी धाव घेत पत्नी सोनाली वांढरे (वय ३०), मुलगी संस्कृती वांढरे (वय ९ वर्षे) ह्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी अहमदनगर येथील खासगी हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. मयत कानिफ वांढरे यांच्यावर पांढरी गावी शनिवारी दुपारी २ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले. आष्टी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक सोनाजी हंबर्डे, पो. का. संजय गुजर हे करीत आहेत.