सगळ्यांना हसवणारा रडवून गेला; Tik-Tok स्टार संतोष मुंडेचा करंट लागून दुर्दैवी मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2022 13:16 IST2022-12-13T20:43:27+5:302022-12-14T13:16:46+5:30
संतोषसह त्याचा मित्र बाबुराव मुंडे याचाही विजेेचा झटका लागून जागीच मृत्यू झाला आहे.

सगळ्यांना हसवणारा रडवून गेला; Tik-Tok स्टार संतोष मुंडेचा करंट लागून दुर्दैवी मृत्यू
धारूर - ग्रामीण भागातील प्रसिद्ध टिक टॉक स्टार संतोष मुंडे यांचा विजेचा विजेचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथे आज (दि.13 मंगळवारी) सांयकाळी साडेसहाच्या दरम्यान घडली. विजच्या झटक्याने संतोषसह त्याचा मित्र बाबुराव मुंडे याचाही जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, धारूर तालुक्यातील भोगलवाडी येथील टिक टॉक स्टार संतोष मुंडे व त्याचा मित्र बाबुराव मुंडे हे दोघे भोगलवाडी ते काळेचीवाडी रस्त्यावर असलेल्या विजेच्या डिपीचे फ्युज टाकण्यासाठी गेले होते. यावेळी अचानक विज आल्यामुळे दोघांचा करंट लागून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.
या घटनेची माहिती कळताच समाज माध्यमातून तीव्र दुखः व्यक्त केले जात आहे. अतिशय गरीब घरातून आलेल्या संतोष मुंडेने आपल्या व्यंगावर मात करत टिक टॉकच्या माध्यमातून वेगळी ओळख निर्माण केली होती. सोशल मीडियावर संतोषचा मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग होता. त्याच्या अशा अकाली निधनामुळे सर्वत्र व्यक्त होत आहे.