एकाचा मृत्यू, १८१ नवे रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:24 IST2021-07-18T04:24:45+5:302021-07-18T04:24:45+5:30
जिल्ह्यात शुक्रवारी ४ हजार ८१८ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचे अहवाल शनिवारी दुपारी प्राप्त झाले. यात १८१ पॉझिटिव्ह ...

एकाचा मृत्यू, १८१ नवे रुग्ण
जिल्ह्यात शुक्रवारी ४ हजार ८१८ संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांचे अहवाल शनिवारी दुपारी प्राप्त झाले. यात १८१ पॉझिटिव्ह तर ४ हजार ६३७ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. बाधितांमध्ये अंबाजोगाई तालुक्यात ८, आष्टी ५२, बीड २६, धारूर ७, गेवराई १६, केज १५, माजलगाव ८, पाटोदा १६, शिरूर १६ व वडवणी तालुक्यातील १७ रुग्णांचा समावेश आहे.
तसेच मागील २४ तासांत एक मृत्यूची नोंद पोर्टलवर झाली. यात कडा (ता. आष्टी) येथील ६५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. आता एकूण बाधितांची संख्या ९४ हजार ६३८ इतकी झाली आहे. पैकी ९० हजार ७४१ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून २ हजार ५७१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या १ हजार ३२६ रुग्ण उपचार घेत आहेत.
म्युकरमायकोसिसच्या दोन रुग्णांची वाढ
म्युकरमायकोसिस या काळ्या बुरशीच्या आजाराने गत २४ तासांत एका रुग्णाचा मृत्यू झाला. तसेच २ नवे रुग्ण निष्पन्न झाल्याने त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिल्ह्यात आजपर्यंत म्युकरचे १९९ रुग्ण निष्पन्न झाले. पैकी ७८ रुग्ण यशस्वी उपचारानंतर घरी परतले, तर सध्या ७४ रुग्ण उपचाराखाली आहेत. आतापर्यंत ३५ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. जिल्हा आरोग्य विभागाने ही माहिती दिली.