एटीएम कार्डाची अदलाबदल करून दीड लाखाची रक्कम हडपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:26 IST2021-01-10T04:26:01+5:302021-01-10T04:26:01+5:30

स्वाराती रुग्णालयाच्या परिसरात राहणाऱ्या रागिणी देवदास पवार यांनी आपले एटीएम कार्ड त्यांचे पती देविदास शंकर पवार यांच्याकडे एटीएम सेंटरमधून ...

One and a half lakh was seized by exchanging ATM cards | एटीएम कार्डाची अदलाबदल करून दीड लाखाची रक्कम हडपली

एटीएम कार्डाची अदलाबदल करून दीड लाखाची रक्कम हडपली

स्वाराती रुग्णालयाच्या परिसरात राहणाऱ्या रागिणी देवदास पवार यांनी आपले एटीएम कार्ड त्यांचे पती देविदास शंकर पवार यांच्याकडे एटीएम सेंटरमधून रक्कम काढण्यासाठी दिले होते. रुग्णालयाच्या परिसरात असलेल्या एसबीआय एटीएम सेंटरवर देविदास पवार यांनी साडेनऊ हजारांची रक्कम काढली. यावेळी खिशातील वस्तू खाली पडल्याने ती घेण्यासाठी पवार हे खाली वाकले असता चोरटा अगदी शिताफीने एटीएम कार्डाची अदलाबदल करून निघून गेला. नंतर याच एटीएम कार्डाद्वारे चोरट्याने रागिणी पवार यांच्या खात्यातून एक लाख ४४ हजार ७६० रुपयांची रक्कम इतर एटीएम सेंटरवरून काढून घेतली. हा प्रकार लक्षात आल्यानंतर रागिणी पवार यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: One and a half lakh was seized by exchanging ATM cards

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.