विजयादशमीनिमित्त परळीत वैजनाथाच्या पालखीची मिरवणुक उत्साहात
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2022 19:10 IST2022-10-05T19:09:07+5:302022-10-05T19:10:37+5:30
पालखीची सवाद्य मिरवणूक आज सायंकाळी शहरातील पारंपारिक मार्गावरून काढण्यात आली.

विजयादशमीनिमित्त परळीत वैजनाथाच्या पालखीची मिरवणुक उत्साहात
परळी (बीड) : विजयादशमीनिमित्त देशातील बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळी येथील प्रभू श्री वैजनाथाच्या पालखीची सवाद्य मिरवणूक आज सायंकाळी शहरातील पारंपारिक मार्गावरून काढण्यात आली.
येथील वैद्यनाथ मंदिरातून पालखी सोहळ्यास प्रारंभ झाला. प्रभू श्री वैद्यनाथ भगवान की जय, हर हर महादेव चा जयघोष श्री वैद्यनाथाची पालखी मिरवणूक निघाली. पालखीचे ठिकठिकाणी शिवभक्त दर्शन घेत आहेत. पालखी मिरवणुकीसोबत श्री वैजनाथ देवस्थान ट्रस्टचे सचिव राजेश देशमुख विश्वस्त प्रा बाबासाहेब देशमुख, प्रा प्रदीप देशमुख,विजयकुमार मेनकुदळे,रघुवीर देशमुख, नंदकिशोर जाजू ,अनिल तांदळे व पुजारी यांच्या इतर विश्वस्त सहभागी झाले आहेत. तसेच अनेक भाविकही पालखी मिरवणूक सोहळ्यात सहभागी झाले आहेत. ही पालखी देवी मंदिर, बटू भैरव मंदिर मार्गे वैद्यनाथ मंदिर कडे येते मंगळवारी आली.