बांधकाम साहित्याचा अड‌थळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:33 IST2021-04-25T04:33:18+5:302021-04-25T04:33:18+5:30

बीड : शहरात ठिकठिकाणी बांधकामे सुरू आहेत. लॉकडाऊनमुळे बांधकामास अनुमती परंतू दुकानांना प्रतिबंध असल्याने बांधकाम करणाऱ्यांनी वाळू, खडी, विटा, ...

Obstruction of construction materials | बांधकाम साहित्याचा अड‌थळा

बांधकाम साहित्याचा अड‌थळा

बीड : शहरात ठिकठिकाणी बांधकामे सुरू आहेत. लॉकडाऊनमुळे बांधकामास अनुमती परंतू दुकानांना प्रतिबंध असल्याने बांधकाम करणाऱ्यांनी वाळू, खडी, विटा, सिमेंटची जमवाजमव केली. परंतू हे बांधकाम साहित्य सातत्याने रस्त्यापर्यंत ठेवले जात असल्यो परिणामी वाहनचालकांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागून वाहतुकीस अडथळा होत आहे.

हातपंप दुरूस्त करा पाटोदा : तालुक्यातील दासखेड परिसरातील हातपंप नादुरुस्त आहेत. उन्हाळ्याची चाहूल लागलेली असताना हातपंप दुरुस्त करून घ्यावेत, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.

शेतीला पाणी मिळेना

बीड : नेकनूर, येळंबघाट, चौसाळा या भागात विजेचा लपंडाव सुरू आहे. महावितरणकडून सुरळीत वीजपुरवठा होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. शेतीला पाणी देण्याचे हे दिवस असल्याने वारंवार वीज खंडित होत असल्याने अडचण येत आहे.

फांद्यामुळे अपघात

वडवणी : ग्रामीण भागाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर बाभळी व इतर झाडांच्या फांद्या वाढल्यामुळे वळणावर समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. परिणामी अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. फांद्या छटाई करण्याची मागणी होत आहे.

पर्यावरणास धोका

वडवणी : शहर आणि परिसरात वृक्षतोडीचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. त्यामुळे पर्यावरणास धोका निर्माण होत आहे. त्यामुळे संबंधितांसह दोषी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे.

Web Title: Obstruction of construction materials