शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
4
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
5
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
6
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
7
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
8
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
9
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
10
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
11
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
12
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
13
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
14
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
15
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
16
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
17
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
18
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
19
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
20
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा

नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2025 06:36 IST

३० जुलै २०२४ ते २५ मे २०२५ या कालावधीत प्रशांत खाटोकर आणि विजय पवार हे दोघे पीडितेला क्लास संपल्यानंतर केबिनमध्ये बोलावून घेत जबरदस्तीने अश्लील वर्तन करायचे.

बीड : शहरातील उमाकिरण खासगी क्लासेसमध्ये ११ वीच्या विद्यार्थिनीला बॅड टच करत तिचे नग्न करून फोटो काढले. हा त्रास असह्य झाल्याने पीडिता मागील १५ दिवसांपासून जेवलीही नाही. रात्रीच्या वेळी अचानक दचकून जागी व्हायची. हा प्रकार पाहून आईने विश्वासात घेऊन विचारल्यावर या प्रकरणाला वाचा फुटली. या प्रकरणातील आरोपी विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांच्या शोधासाठी पोलिसांची तीन पथके रवाना झाली आहेत.

३० जुलै २०२४ ते २५ मे २०२५ या कालावधीत प्रशांत खाटोकर आणि विजय पवार हे दोघे पीडितेला क्लास संपल्यानंतर केबिनमध्ये बोलावून घेत जबरदस्तीने अश्लील वर्तन करायचे. यामुळे पीडिता तणावाखाली होती. हे पाहून पालक अभ्यासाचा ताण असेल या हेतूने विजय पवार याच्याकडे विचारण्यास गेल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पालकांनी मुलीलाच विश्वासात घेत विचारणा केली. त्यानंतर तिने हे सर्व वास्तव सांगितले. त्यामुळे गुरुवारी रात्री उशिरा शिवाजीनगर ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

फरार होण्याआधी वाढदिवसाला हजेरी

गुन्हा दाखल झाल्याची माहिती होताच विजय पवार व प्रशांत खाटोकर हे दोन्ही आरोपी फरार झाले. रात्रभर १०० पोलिसांचा फौजफाटा त्यांचा शोध घेत होता. फरार होण्यापूर्वी हे दोन्ही आरोपी एका व्यक्तीच्या वाढदिवसालाही हजर असल्याचे सूत्रांनी सांगितले.

नातेवाइकांना घेतले चौकशीसाठी ताब्यात 

प्रशांत खाटोकरची पत्नी आणि वडील या दोघांनाही चौकशी आणि सुरक्षेच्या अनुषंगाने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात शुक्रवारी दिवसभर बसविण्यात आले होते.

आरोपींच्या शोधासाठी तीन पथके रवाना झाली आहेत. तसेच क्लासेसजवळ गुन्हा दाखल होताच बंदोबस्त तैनात केला. - किशोर पवार, पोलिस निरीक्षक, बीड

टॅग्स :Sexual abuseलैंगिक शोषणsexual harassmentलैंगिक छळCrime Newsगुन्हेगारीStudentविद्यार्थीTeacherशिक्षक