शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

आता काकाची उमेदवारी बदला पुतण्याला द्या; जयसिंह सोळंके समर्थक अजित पवारांच्या भेटीला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2024 14:31 IST

रमेश आडसकर यांना उमेदवारी मिळेल असे गृहीत धरून प्रकाश सोळंकेना उमेदवारी दिल्याची अजित पवारांची कॉल रेकॉर्डिंग व्हायरल; विरोधी पक्षातून जगतापांना तिकीट मिळताच जयसिंह सोळंके समर्थक अजित पवारांच्या भेटीला

- पुरुषोत्तम करवामाजलगाव: निवृत्ती जाहीर करून पुतण्याचे नाव पुढे केल्यानंतर पुन्हा स्वतःच उमेदवारी घेतल्यामुळे प्रकाश सोळंके यांचे पुतणे जयसिंह सोळंके आणि त्यांचे समर्थक नाराज झाले होते. दरम्यान, शरद पवार गटाकडून  आडसकर यांना उमेदवारी मिळत असल्यामुळे त्यांना फक्त प्रकाश सोळंके पाडू शकतात अशा प्रकारची अजित पवार यांची क्लिप व्हायरल झाली होती. परंतु आडसकर यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे प्रकाश सोळंके यांची उमेदवारी बदलून जयसिंह सोळंके यांना द्यावी, अशी मागणी करण्यासाठी जयसिंह सोळंके यांचे शेकडो समर्थक अजित पवार यांना भेटायला गेल्याची माहिती आहे. 

दोन महिन्यापूर्वी विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी राजकारणातून  निवृत्ती जाहीर केली होती. त्याचबरोबर मागील निवडणुकीत ही आपली शेवटची निवडणूक असल्याचे सांगितले होते. त्यामुळे प्रकाश सोळंके यांनी त्यांचे पुतणे जयसिंह सोळंके यांचे नाव पुढे केले होते. मात्र, राष्ट्रवादी कॉँग्रेसकडून जयसिंह सोळंके यांना तिकीट न मिळता पुन्हा प्रकाश सोळंके यांनाच तिकीट मिळाले. यामुळे जयसिंह सोळंके यांचे कार्यकर्ते नाराज झाले. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी अजित पवार यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. यामध्ये त्यांनी शरद पवार गटाकडून रमेश आडसकर यांचे नाव येत असल्यामुळे त्यांना केवळ प्रकाश सोळंकेच पाडू शकतात. त्यामुळे त्यांना कोराच बी फार्म दिल्याचे सांगितले होते. प्रकाश सोळंके यांनी कोऱ्या बी फॉर्मवर जयसिंह सोळंके यांचे नाव टाकण्याऐवजी स्वतःचेच नाव टाकल्याची चर्चा मतदारांमध्ये रंगू लागली आहे.

जगताप यांना उमेदवारी आता जयसिंह यांना तिकीट द्याशरद पवार गटाकडून रमेश आडसकर यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे आता प्रकाश सोळंके ऐवजी  जयसिंह सोळंके यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी करण्यासाठी माजलगाव मतदार संघातील  १५० ते २०० गाड्या रविवारी रात्री मुंबईकडे रवाना झाल्या. मुंबईला शेकडो कार्यकर्ते गेले असून ते आज अजित पवार यांची भेट घेणार आहेत.

प्रकाश सोळंकेंनी अद्याप उमेदवारी दाखल केली नाहीविशेष म्हणजे, प्रकाश सोळंके यांना चार दिवसापूर्वीच उमेदवारी मिळाल्यानंतर देखील अद्याप पर्यंत  त्यांनी उमेदवारी दाखल केलेली नाही. यामुळे अजित पवार यांच्या भेटी नंतरच यात काहीतरी मार्ग निघू शकेल, असे जयसिंह सोळंके यांच्या कार्यकर्त्यांमधून बोलले जाऊ लागले आहे. जयसिंह सोळंके यांना उमेदवारी न मिळाल्यास त्यांचे समर्थक प्रकाश सोळंके यांचा प्रचार करणार नसल्याची देखील चर्चा पहावयास मिळत आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४marathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकmajalgaon-acमाजलगांवNCPराष्ट्रवादी काँग्रेसPrakash Solankeप्रकाश सोळंकेAjit Pawarअजित पवार