शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

अवैध बांधकामप्रकरणी ठोस कारवाई न झाल्याने बीड नगर परिषदेला हायकोर्टाची नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 1:22 PM

शहरातील हिरालाल चौक भागातील बुरूड गल्ली वळणावरील वादग्रस्त जागेतील बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जिल्हाधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी व नगररचनाकार विभाग बीड यांना नोटीस बजावली आहे.

ठळक मुद्देअब्बड यांनी दहिवाळ यांच्या सिटी सर्व्हे क्रमांक ४५९९ मधील व नगर परिषद घर क्र . ३-९-५७ मधील बेकायदेशीर बांधकामाबाबत पालिकेकडे २०१४ मध्ये तक्रार दिली होती. जिल्हाधिकारी यांनंी २१ मार्च २०१६ रोजी पालिका मुख्याधिकारी यांनी योग्य त्या कारवाईचे आदेश दिले होते, अद्यापही ठोस कारवाई न करता अवैध बांधकाम करणा-या दहिवाळ यांना पाठीशी घालण्यात आले.

बीड : शहरातील हिरालाल चौक भागातील बुरूड गल्ली वळणावरील वादग्रस्त जागेतील बेकायदेशीर बांधकाम केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने जिल्हाधिकारी, नगर परिषद मुख्याधिकारी व नगररचनाकार विभाग बीड यांना नोटीस बजावली आहे. संदीप दहिवाळ व रामदास दहिवाळ यांनी बेकायदेशीर बांधकाम केल्याचे हे प्रकरण आहे.

अब्बड यांनी दहिवाळ यांच्या सिटी सर्व्हे क्रमांक ४५९९ मधील व नगर परिषद घर क्र . ३-९-५७ मधील बेकायदेशीर बांधकामाबाबत पालिकेकडे २०१४ मध्ये तक्रार दिली होती. पालिकेने या घर क्र . ३-९-५७ या जागेमध्ये बांधकाम परवानगी, ज्याचा परवाना क्र .१९० दि. ०९-०१-२०१२ नुसार तळमजला वाणिज्य वापराकरीता बांधकाम परवानगी देण्यात आली होती. प्रत्यक्षात नगर परिषदेने प्रत्यक्ष पाहणी केली असता  तळमजला वाणिज्य व पहिला व दुसरा मजला बांधकाम केलेले आहे. 

दहिवाळ यांनी मालकी हक्काच्या  जागेत बांधकाम न करता सदर जागेचे प्रत्यक्षात मोजमाप घेतले असता २२.९५ चौ.मी. एवढ्या जास्तीच्या क्षेत्रावर दहिवाळ यांनी बांधकाम केल्याचे या कार्यालयाच्या निदर्शनास आले. त्याचप्रमाणे दहिवाळ यांनी परवाना क्र .१९० दि.०९-०१-२०१२ नुसार घेतलेल्या बांधकाम परवानगीची मुदत संपुष्टात आलेली असल्यामुळे व सिटी सर्व्हे क्रमांक ४५९९ वरील क्षेत्रफळात व मालकी हक्काबाबत बदल झालेला असल्याने व बांधकाम परवानगी बाबत आक्षेप अर्ज सादर झाला असल्याने दहिवाळ यांनी दि. २९-१०-२०१४ नुसार मागणी केलेली वाढीव बांधकाम परवानगी देण्यात आलेली नाही.

दहिवाळ यांनी उक्त जागेत वाढीव बांधकाम परवानगी मंजूर केलेली नसतानादेखील त्यांनी वरील प्रमाणे पहिला व दुसरा मजल्याचे अनधिकृत बांधकाम पूर्ण केलेले आहे. त्या अन्वये त्यांचे अनधिकृत बांधकामावर या कार्यालयाने महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचनाकार अधिनियम १९६६ चे कलम ५२, ५३ व ५४ नुसार कार्यवाही प्रस्तावित केलेली आहे. अब्बड यांच्या क्षेत्रात बांधकाम केले आहे. अब्बड यांच्या तक्रारीवरुन पालिकेने पाहणी केल्यानंतर ही बाब समोर आली. पहिला व दुस-या मजल्याचे बांधकाम नियमबाह्य असल्याचे उघडकीस आल्यानंतर पालिकेने दहिवाळ यांच्यावर कारवाई केलेली नाही. त्यामुळे अब्बड यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्र ार केली होती.

जिल्हाधिकारी यांनंी २१ मार्च २०१६ रोजी पालिका मुख्याधिकारी यांनी योग्य त्या कारवाईचे आदेश दिले होते, अद्यापही ठोस कारवाई न करता अवैध बांधकाम करणा-या दहिवाळ यांना पाठीशी घालण्यात आले. त्यामुळे अब्बड यांनी उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली. ज्याचा रिट पिटीशन क्र.११७१८/२०१७ असा आहे. न्या. कंकनवाडी व न्या. आर.एम.बोर्डे यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी, पालिका मुख्याधिकारी व नगर रचनाकार विभाग यांना नोटीस बजावली आहे. अब्बड यांच्यातर्फे अ‍ॅड.डी.बी.पोकळे यांनी काम पाहिले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयBeedबीड