उमदा युवा नेता हरपला, परळीत अनेकांची शोकसंवेदना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:32 IST2021-05-17T04:32:22+5:302021-05-17T04:32:22+5:30

राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खा. राजीव सातव यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे सदस्य संजय दौंड ...

Noble young leader lost, many mourn in Parli | उमदा युवा नेता हरपला, परळीत अनेकांची शोकसंवेदना

उमदा युवा नेता हरपला, परळीत अनेकांची शोकसंवेदना

राष्ट्रीय काँग्रेसचे नेते खा. राजीव सातव यांच्या निधनाची बातमी अतिशय दुःखद असल्याची प्रतिक्रिया विधान परिषदेचे सदस्य संजय दौंड यांनी व्यक्त केली. खा.राजीव सातव यांनी आमदार, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष, लोकसभा सदस्य, राज्यसभा सदस्य असा जबरदस्त प्रवास अत्यंत कमी वयात केला. गुजरात काँग्रेसचे प्रभारी म्हणून त्यांनी अत्यंत नेत्रदीपक असे काम केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रा. मधुकर आघाव म्हणाले. खा. राजीव सातव यांच्या जाण्याने पुन्हा एकदा मराठवाडा पोरका झाल्याचे नाथरा येथील सचिन मुंडे म्हणाले. तर सातव यांच्या रूपाने युवा नेता हरवल्याची प्रतिक्रिया कन्हेरवाडीचे सरपंच रासपा युवक आघाडीचे माजी प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ फड यांनी व्यक्त केली. काँग्रेसचे राज्यसभेतील खा. राजीव सातव यांच्या निधनामुळे कॉलेज जीवनातील एक मित्र गमावला. विजय लटंगे व नारायण वानखेडे यांच्या बरोबर त्यांची नेहमी पुण्याच्या डेक्कन परिसरात भेट व्हायची, अशी आठवण सांगत गोवर्धन हिवऱ्याचे माजी सरपंच राजाभाऊ निर्मळ पाटील यांनी शोक संवेदना व्यक्त केली.

Web Title: Noble young leader lost, many mourn in Parli