ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 16:46 IST2025-05-16T16:45:17+5:302025-05-16T16:46:42+5:30
आष्टी तालुक्यातील वनवेवाडी येथील १,००० लोकसंख्या असलेली वाडी; पण रस्त्यांची अवस्था बिकट आहे.

ना रस्ता... ना बस, मोबाइलला तर रेंजही नाही; अखेर गावकऱ्यांनी बीडमधील वाडीच काढली विक्रीला!
नितीन कांबळे
कडा (जि. बीड): वाडीत जाण्यासाठी रस्ता, संपर्क साधण्यासाठी मोबाइल रेंज, बस यासह अनेक सुविधांचा अभाव असल्याने वारंवार मागणी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने वैतागलेल्या नागरिकांनी गुरुवारी सकाळी चक्क वाडीच विक्रीला काढली. हा निर्धार गाव बैठकीत केला.
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
आष्टी तालुक्यातील वनवेवाडी येथील १,००० लोकसंख्या असलेली वाडी; पण रस्त्यांची अवस्था बिकट आहे.
रेंजसाठी चढावे लागते झाडावर
मोबाइलला रेंज येत नसल्याने ग्रामस्थ अनेकदा झाडावर चढतात. अगदी जीव धोक्यात घालून त्यांना संवाद साधावा लागत आहे. त्यामुळेच आम्ही वैतागलो, असे ग्रामस्थांनी सांगितले.
आमच्या वाडीला रस्ता नाही. मोबाइलला रेंज मिळत नाही, बस येत नाही. सुविधांचा अभाव आहे. ग्रामस्थांनी वैतागून वाडीची विक्री करण्याचा निर्णय घेतला.
विष्णू वनवे, माजी सरपंच
ग्रामस्थांनी काय निर्धार केला हे अद्याप आमच्यापर्यंत आले नाही. लेखी स्वरूपात कळले तर काही मार्ग काढला जाईल.
वैशाली पाटील, तहसीलदार
गाव बैठकीत निर्धार
पक्का रस्ता नसल्याने वनवेवाडीतील नागरिकांना प्रचंड
हाल सोसावे लागत आहेत. तर विद्यार्थ्यांना पायी चालताना अडचणीचा सामना करावा लागतो. पाऊस झाल्यावर या रस्त्याला नदी-नाल्याचे स्वरूप येते.
वयोवृद्ध नागरिकांना दवाखान्यात येण्यासाठी कोणतीही रुग्णवाहिका या गावात येत नाही. एसटी तर फक्त मतदान पेटीसाठीच गावात येते.
राज्य सरकारने आमचे गाव 3 विकत घ्यावे नाहीतर रस्ता द्यावा, अशा निर्धार ग्रामस्थांनी बैठकीत घेतला.