बीडमध्ये 'नो आरक्षण, नो वोट मोहीम'; मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी तरुण आग्रही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2022 14:18 IST2022-09-12T14:18:19+5:302022-09-12T14:18:49+5:30
आरक्षणासाठी अनेकजण हुतात्मा झाले तरी देखील ठोस पाऊल उचलली जात नाहीय.

बीडमध्ये 'नो आरक्षण, नो वोट मोहीम'; मराठा समाज आरक्षणाच्या मागणीसाठी तरुण आग्रही
बीड - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी बीड जिल्ह्यात 'नो आरक्षण... नो वोट...', ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. राज्यातील सरकार बदलली मात्र आरक्षणाचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. आरक्षणासाठी अनेकजण हुतात्मा झाले तरी देखील ठोस पाऊल उचलली जात नाहीय. हीच बाब लक्षात घेऊन आता बीड जिल्ह्यात आरक्षणाच्या मागणीसाठी आग्रही भूमिका घेतली जातेय.
माजलगाव येथे सामूहिक शपथ घेऊन नो आरक्षण... नो वोट... याला समर्थन देण्यात आलं. तर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आरक्षणाच्या मागणीसाठी घोषणाबाजी करून जिल्हाधिकाऱ्यांना आरक्षणासाठी पत्रव्यवहार करण्यात आलाय.