शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
आयटीनंतर ॲाटो क्षेत्रातही कर्मचारी कपात, ही कंपनी ३००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार   
4
“RSS-BJPने ओबीसींचा घात केला, मोहन भागवत कधी गजानन महाराजांच्या दर्शनाला गेले का”: आंबेडकर
5
टॉपर तरुणीला गुंगीचे औषध देऊन अत्याचार; स्वतःला संपवायला निघालेल्या माय-लेकीला माजी सैनिकाने वाचवलं
6
"भारत माझी मातृभूमी, तर पाकिस्तान…’’, दानिश कनेरियाचं मोठं विधान, नागरिकत्वाबाबत म्हणाला  
7
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
8
भारतीय तरुणांना फसवून सायबर गुन्ह्यांसाठी जुंपणारी आंतरराष्ट्रीय टोळी उघडकीस; दोघे अटकेत, भारतीय आरोपींसह चिनी कनेक्शन आले समोर 
9
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
10
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
11
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
12
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
13
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
14
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
15
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
16
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
17
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
18
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
19
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
20
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे

दोन वर्षांनंतरही न्याय नाही! महादेव मुंडे खून प्रकरणी ज्ञानेश्वरी मुंडेंचा मुख्यमंत्र्यांकडे मोठी मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2025 19:07 IST

महादेव मुंडे खून प्रकरणास दोन वर्ष होत आले तरी अद्याप आरोपी निष्पन्न नाहीत; मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून तपासाला गती द्यावी, ज्ञानेश्वरी मुंडे यांची मागणी

परळी : येथील प्रिया नगर परिसरातील बँकेचे पिग्मी एजंट महादेव दत्तात्रय मुंडे यांच्या खुनाला दोन वर्षे पूर्ण होत आली तरीही आरोपी अद्याप निष्पन्न झालेले नाहीत. या प्रकरणातील तपास ठप्प झाल्याने मुख्यमंत्र्यांनी स्वतः हस्तक्षेप करून तपासाला गती द्यावी, अशी मागणी महादेव मुंडे यांच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे. 

21 ऑक्टोबर 2023 रोजी परळी येथील तहसील कार्यालयाजवळील पटांगणात महादेव मुंडे यांची तीक्ष्ण हत्याराने निर्घृण हत्या करण्यात आली होती. घटनेला दोन वर्षांचा कालावधी होत आला आहे. या मध्ये पोलिसांनी कोणत्याही आरोपीला अटक केलेली नाही. या निष्क्रियतेबद्दल ज्ञानेश्वरी मुंडे यांनी पोलीस प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. दोन दिवसांपूर्वी मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनीही या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करून तपासाला गती द्यावी, अशी मागणी केली होती, असे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी सांगितले. 

या प्रकरणाचा तपास एसआयटीमार्फत व्हावा म्हणून मुंडे यांच्या कुटुंबीयांनी 30 जुलै 2025 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. त्यानंतर पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू करण्यात आला. मात्र,त्यांच्या तपासास दोन महिने उलटूनही आरोपी निष्पन्न झाले नाहीत व त्यांचा ठावठिकाणा लागलेला नाही. पंकज कुमावत यांच्यावर आपला विश्वास आहे असे ही त्यांनी सांगितले. 

तपासात लक्षणीय प्रगती नाहीदरम्यान, 25 जुलै 2025 रोजी कनेरवाडी येथे ज्ञानेश्वरी मुंडे यांच्या माहेर आणि सासरच्या नातेवाइकांनी एसआयटी स्थापन व तपासाच्या मागणीसाठी रस्ता रोको आंदोलन केले होते. तसेच जुलै महिन्यामध्ये मनोज जरांगे पाटील यांनी परळीत येऊन मुंडे कुटुंब याची भेट घेतली होती . महादेव मुंडे खून प्रकरणात नेमकं दडलय काय हे मुख्यमंत्र्यांनी जगासमोर आणावे असे आवाहनही त्यांनी केले आहे. अद्याप तपासात कोणतीही लक्षणीय प्रगती झालेली नाही. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केला आहे. खासदार सुप्रिया सुळे यांचाही माझ्याशी संपर्क असतो असे त्या म्हणाले

English
हिंदी सारांश
Web Title : Two years on, justice delayed in Mahadev Munde murder case.

Web Summary : Two years after Mahadev Munde's murder, the accused remain unidentified. His wife, Dnyaneshwari Munde, appeals to the Chief Minister for intervention and expediting the investigation, expressing dissatisfaction with the police's inaction. The family seeks an SIT probe.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याBeedबीड