शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

आईच्या मृतदेहावर चिमुकल्याने काढली रात्र

By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2018 6:01 AM

छत्तीसगडहून महाराष्ट्रात मजुरीसाठी आलेल्या तरुणाने पत्नीचा गळा दाबून खून केला.

आष्टी/कडा (जि. बीड) : छत्तीसगडहून महाराष्ट्रात मजुरीसाठी आलेल्या तरुणाने पत्नीचा गळा दाबून खून केला. त्यांचा दोन वर्षांचा चिमुकला आईच्या मृतदेहावर पडून रडला अन् तसाच झोपी गेला. सकाळी आई उठत नसल्याने तो पुन्हा रडू लागला. त्याच्या आवाजाने महिलेचा मृत्यू झाल्याचे शेजारील लोकांच्या लक्षात आले.आष्टी तालुक्यातील धानोरा येथे ही हृदयद्रावक घटना घडली. बिमला सतनामी असे मृत महिलेचे नाव असून, तिचा पती विनोद फरार झाला आहे. मजुरीच्या शोधात सतनामी दांपत्य चिमुकल्यासह धानोऱ्यात आले होते. विनोद हा बांधकामावर मजुरी करत होता. शनिवारी रात्री दोघांमध्ये वाद झाला. विनोदने पत्नीचा गळा आवळून खून केला. बाजूलाच असलेला चिमुकला रडतच आईच्या पोटावर झोपी गेला. सकाळी उठल्यावर त्याने आईला उठविण्याचा प्रयत्न केला असावा. पण, ती उठत नसल्याचे पाहून तो पुन्हा रडू लागला. त्याचा आवाज ऐकून शेजारचे लोक त्यांच्या घराकडे धावले.रडून रडून चिमुकल्याचा घसा कोरडा पडला होता. सकाळी हा सर्व प्रकार ग्रामस्थांनी पाहिल्यानंतर त्यांचे डोळे पाणावले, महिलांना अश्रू अनावर झाले होते.