चिमुकलीवर शेजाऱ्याचा अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2018 04:52 IST2018-04-09T04:52:20+5:302018-04-09T04:52:20+5:30

घरासमोर खेळणा-या पाच वर्षीय बालिकेला शेजा-याने स्वत:च्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घृणास्पद घटना शनिवारी शहरातील बरकतनगर भागात उघडकीस आली.

Neighbor's atrocity on Chimukulla | चिमुकलीवर शेजाऱ्याचा अत्याचार

चिमुकलीवर शेजाऱ्याचा अत्याचार

परळी (जि. बीड) : घरासमोर खेळणा-या पाच वर्षीय बालिकेला शेजा-याने स्वत:च्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घृणास्पद घटना शनिवारी शहरातील बरकतनगर भागात उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी इद्रिस बशीर शेख (५०) याला अटक केली आहे.
बरकतनगर भागातील घरासमोर पाच वर्षीय पीडित बालिका दुपारी ४च्या सुमारास खेळत होती. समोरच्या घरात भाड्याने राहणाºया इद्रिसने तिला घरात नेले आणि अत्याचार केला. पीडितेने हा प्रकार घरी सांगितल्यानंतर, तिची आई आणि अन्य शेजाºयांनी इद्रिसला बेदम चोप देत, पोलिसांच्या हवाली केले.

Web Title: Neighbor's atrocity on Chimukulla