राष्ट्रवादी काँग्रेस सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:36 IST2021-09-21T04:36:58+5:302021-09-21T04:36:58+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क केज : २०१७ पासून ते आतापर्यंत पक्षाची ध्येयधोरणे लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले. राष्ट्रवादी पक्ष हा सर्वसामान्य ...

NCP is a party that gives justice to ordinary workers | राष्ट्रवादी काँग्रेस सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष

राष्ट्रवादी काँग्रेस सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष

लोकमत न्यूज नेटवर्क

केज : २०१७ पासून ते आतापर्यंत पक्षाची ध्येयधोरणे लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम केले. राष्ट्रवादी पक्ष हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देणारा पक्ष आहे. मी अशा पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय. अखेरच्या श्वासापर्यंत राष्ट्रवादी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करेल. तुम्हीही करा, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्ह्याचे पक्ष निरीक्षक जीवन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली केज येथे आढावा बैठक पार पडली. यावेळी मार्गदर्शन करताना सोनवणे बोलत होते. यावेळी माजी आमदार पृथ्वीराज साठे उपस्थित होते. संघटना बांधणी करण्यासाठी पक्षाची भूमिका लोकांपर्यंत पाेहोचविण्याचे आवाहन जीवन गोरे यांनी केले. यावेळी माजी आमदार पृथ्वीराज साठे यांनीही मार्गदर्शन केेले.

प्रास्ताविक राष्ट्रवादी काँग्रेसचे केज तालुकाध्यक्ष नंदकुमार मोराळे यांनी केले. सूत्रसंचालन अनंत सुरवसे यांनी केले. आभार अंबाजोगाईचे तालुकाध्यक्ष ताराचंद शिंदे यांनी मानले. सूत्रसंचालन अनंत सुरवसे यांनी केले.

यावेळी नवाब मामू, दत्ताआबा पाटील, डॉ. नरेंद्र काळे, जयसिंगभैय्या सोळंके, बबनभैय्या लोमटे, विलासकाका सोनवणे, बालासाहेब दादा बोराडे, शंकर अण्णा उबाळे, बालासाहेब शेप, युवराजदादा गोरे, संगीताताई तूपसागर, सुरज खोडसे, अविनाश धायगुडे, संजीवनीताई देशमुख, अंजलीताई पाटील, विद्याताई तारळकर, मुकुंद कणसे, शरीफ सय्यद, भाऊसाहेब गुंड, नारायण शिंदे, शिवाजी चौधरी, उमाकांत भुसारी, पिंटू ठोंबरे, प्रेमचंद कोकाटे उपस्थित होते.

180921\35311948-img-20210918-wa0019.jpg~180921\3531img-20210918-wa0022.jpg

केज येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठकित बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे~केज येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठकित बोलताना पक्ष निरीक्षक जीवन गोरे.

Web Title: NCP is a party that gives justice to ordinary workers