राष्ट्रवादी काँग्रेस, लोकमततर्फे उद्या परळीत महारक्तदान शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:24 IST2021-07-18T04:24:23+5:302021-07-18T04:24:23+5:30
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे ...

राष्ट्रवादी काँग्रेस, लोकमततर्फे उद्या परळीत महारक्तदान शिबिर
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व राज्याचे सामाजिक न्याय व विशेष साहाय्य मंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आयोजित ‘आरोग्य सेवा सप्ताह’ या लोकोपयोगी आरोग्यदायी उपक्रमात सोमवारी लोकमत समूहाच्या संयुक्त विद्यमाने महारक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. प्रत्येकामध्ये रक्ताचे नाते निर्माण व्हावे आणि लोक एकत्र यावेत, यासाठी हा भव्य सामाजिक उपक्रम घेण्यात येत आहे. सध्याचा काळ अतिशय कठीण असून, रक्तदात्यांची गरज पुन्हा एकदा यानिमित्ताने अधोरेखित झाली आहे. रक्तदानाचे सामाजिक उत्तरदायित्व सध्या आपल्या सगळ्यांच्याच खांद्यावर आहे. म्हणूनच सर्वच नागरिकांना आम्ही रक्तदानासाठी घराबाहेर पडा आणि या सामाजिक कार्यात सहभागी व्हा, असे कळकळीचे आवाहन परळीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी केले आहे.