६० हजारांची लाच स्वीकारताना नगरपंचायतचे मुख्याधिकारी रंगेहाथ ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2020 21:30 IST2020-07-20T21:29:05+5:302020-07-20T21:30:26+5:30
स्वच्छता विभागातील केलेल्या कामाची देयके अदा करण्यासाठी लाच मागितली

६० हजारांची लाच स्वीकारताना नगरपंचायतचे मुख्याधिकारी रंगेहाथ ताब्यात
बीड : स्वच्छता विभागातील देयके अदा करण्यासाठी ६० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पाटोदा नगर पंचायतच्या मुख्याधिकाऱ्यासह चालकास लाचलूचपत प्रतिबंधक पथकाने सोमवारी सायंकाळच्या सुमारास ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
नगरपंचायतचे मुख्याधिकारी शशिकांत भोसले असे लाच स्वीकारणाऱ्याचे नाव आहे. त्यानी तक्रारदाराकडे स्वच्छता विभागातील केलेल्या कामाची देयके अदा करण्यासाठी लाच मागितली होती. सोमवारी सायंकाळी लाचलूचपत प्रतिबंधक पथकाचे उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे यांच्या पथकाने लाच स्वीकारताना मुख्याधिकारी शशिकांत भोसले व चालक प्रदीप वाघ या दोघांना रंगेहात पकडले.
ही कारवाई लाचलुचपत विभागाचे पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक डॉ.अनिता जमादार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हानपुडे व त्यांच्या पथकाने केली.