Video: नादखुळा! पठ्ठ्याने चक्क पोकलेन मशिनच्या खोऱ्यालाच बांधला झोका

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 06:53 PM2023-08-21T18:53:57+5:302023-08-21T18:59:01+5:30

आष्टी तालुक्यातील घाटपिंपरी येथील झोक्याचा व्हिडिओ व्हायरल.

Nadkhula! The swing was tied to the hand of the poklane machine | Video: नादखुळा! पठ्ठ्याने चक्क पोकलेन मशिनच्या खोऱ्यालाच बांधला झोका

Video: नादखुळा! पठ्ठ्याने चक्क पोकलेन मशिनच्या खोऱ्यालाच बांधला झोका

googlenewsNext

- नितीन कांबळे
कडा -
 बेसुमार वृक्ष तोडीमुळे शहरांसह गावातील मोठी वृक्ष नामशेष झाली आहेत. एरवी याची कोणाला परवा वाटत नाही. मात्र, नागपंचमी सणाला झोका बांधण्यासाठी मोठे वृक्षच राहिले नाहीत. यामुळे घाटपिंपरी येथील एका पठ्ठ्याने चक्क पोकलेन मशिनच्या पुढच्या खोऱ्याला झोका बांधून नागपंचमीनिमित्त झोका खेळण्याचा आनंद घेतला.

पर्यावरणाचा समतोल राखला जावा यासाठी शासन मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करत असते. मात्र, वृक्षतोडीचे प्रमाण बेसुमार आहे. यामुळे मोठ्या झाडांची संख्या कमी होत आहे.  सध्या पर्यावरणाचा समतोल राखण्यात शासनाला अपयश येत असल्याने झाडांची संख्खा दिवसेंदिवस कमी चालली असल्याने नैसर्गिक संकट ओढावले जात आहे. ग्रामीण भागात देखील वृक्षतोड होत असल्याने मोठमोठी झाडे नामशेष होत गेली. यामुळे नागपंचमी सणाला बांधले जाणारे झोके कुठे बांधायचे हा प्रश्न अनेक गावांत भेडसावत आहे. यावर उपाय म्हणून आष्टी तालुक्यातील घाटापिंपरी येथील  एका पठ्याने चक्क पोकलेन मशिनच्या समोरच्या खोऱ्याला झोका बांधला. या झोका खेळण्याचा मनसोक्त आनंद घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

Web Title: Nadkhula! The swing was tied to the hand of the poklane machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.