माझा गांव - सुंदर गाव अभियान : विकासासाठी केले मार्गदर्शन - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 12, 2021 04:31 IST2021-02-12T04:31:25+5:302021-02-12T04:31:25+5:30
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात विभागीय पातळीवर पुरस्कार मिळविणारी कोळवाडी गावातील लोकाभिमुख उपक्रमांसाठी आदर्श ठरली आहे. जिल्ह्यात २२ ...

माझा गांव - सुंदर गाव अभियान : विकासासाठी केले मार्गदर्शन - A
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात विभागीय पातळीवर पुरस्कार मिळविणारी कोळवाडी गावातील लोकाभिमुख उपक्रमांसाठी आदर्श ठरली आहे. जिल्ह्यात २२ जानेवारी ते २० मार्च या कालावधीत माझा गाव - सुंदर गाव अभियान सुरू आहे. या अभियानात कोळवाडी येथे जाेरदार तयारी सुरू आहे. शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी गावात भेट दिली. या अभियानाच्या कालावधीत गाव स्तरावरील ग्रामपंचायत, शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र ,उपकेंद्र, पशुवैद्यकीय दवाखाना, आदी शासकीय कार्यालयातील अभिलेखे अद्ययावतीकरण व वर्गीकरण, रंगरंगोटी, स्वच्छता अभियान, ग्रामपंचायतची १०० टक्के कर वसुली, खुली व्यायामशाळा, शाळेसाठी क्रीडांगण, वन्य जिवांसाठी पाणवठा, घनवृक्ष लागवड व इतर नावीन्यपुर्ण उपक्रम राबविण्याबाबत कुंभार यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शासकीय अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. जि. प. प्राथमिक शाळेच्या हंगामी वसतिगृहाला भेट देऊन तेथील विद्यार्थ्यांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांना जेवण दर्जेदार मिळत असल्याची व बायोमेट्रिकवर विद्यार्थ्यांची उपस्थितीची नोंद घेण्यात येत असल्याची त्यांनी खात्री केली. या अभियानासाठी बालविकास प्रकल्प अधिकारी रामेश्वर मुंडे यांनी कोळवाडी येथील अंगणवाडी दत्तक घेतली असून, जवळपास ९० टक्के काम पूर्ण करण्यात आले आहे. यावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी रामेश्वर मुंडे, अंगणवाडी पर्यवेक्षिका रणदिवे, ग्रामसेवक सखाराम काशीद, जि. प. प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका कदम, सर्व शिक्षिका, अंगणवाडी कार्यकर्ती, मदतनीस व नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.