शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी मैदानात...
3
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
4
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
5
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
6
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
7
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
8
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
9
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
10
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
11
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
12
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
13
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
14
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
15
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
16
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
17
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
18
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
19
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
20
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 

माझ्या घरासमोर मोदींना सभा घ्यावी लागते, यातच माझा विजय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 12:10 AM

२४ तास जनतेसाठी राबणाऱ्या एका सामान्य कार्यकर्त्याला संपवण्यासाठी देशाच्या पंतप्रधानाला माझ्या घरासमोर सभा घ्यावी लागते. यातच माझा विजय असल्याचा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व परळी राकॉँचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.

ठळक मुद्देधनंजय मुंडे : परळी येथील गणेशपारच्या सभेत प्रतिपादन

परळी : २४ तास जनतेसाठी राबणाऱ्या एका सामान्य कार्यकर्त्याला संपवण्यासाठी देशाच्या पंतप्रधानाला माझ्या घरासमोर सभा घ्यावी लागते. यातच माझा विजय असल्याचा विश्वास विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते व परळी राकॉँचे उमेदवार धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला.गुरु वारी रात्री गणेशपार भागात झालेल्या जाहीर सभेत ते बोलत होते. ज्या-ज्यावेळी गणेशपारच्या मंदिरात आशीर्वाद घेवून मी सभा घेतली, त्या-त्या वेळी गणरायाने मला कौल दिला आहे. योगायोगाने आज संकष्ट चतुर्थी आहे. हा एक शुभशकुन असल्याचे धनंजय मुंडे यांनी सांगून या गणेश मंदिराचा जीर्णोध्दार करण्याचे, शेजारच्या दुर्गोत्सव मंडळाला सभामंडप देण्याची शक्ती मला गणरायानेच दिली आहे. आज याच गणरायाचे आणि येथील जनतेचे आशीर्वाद मला मिळत असल्याने आपला विश्वास निश्चित असल्याचे ते म्हणाले.माजी मंत्री पंडीतराव दौंड म्हणाले, ही निवडणूक आता धनंजयची राहिली नसून, जनतेची झाली आहे. माकपचे नेते कॉ. पी. एस. घाडगे म्हणाले, धनंजयचा विजय ही परळीची गरज आहे. तर धनंजय मुंडेंनी गणेशपार भागाला खुप काही दिले आता त्याची परतफेड करण्याची आमची वेळ असल्याचे काँग्रेसचे नेते डॉ.सुरेश चौधरी, किर्तीकुमार नरवणे, श्रीकांत मांडे, बाजीराव धर्माधिकारी, दिपक देशमुख, प्रा.डॉ.विनोद जगतकर, वैजनाथ सोळंके यांनी भाषणात सांगितले. या सभेला माजी नगराध्यक्ष सोमनाथअप्पा हालगे, ज्येष्ठ नेते बाळासाहेब देशमुख, डॉ.सुरेश चौधरी, किर्तीकुमार नरवणे, श्रीकांत मांडे, माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख, जाबेरखा पठाण, शहराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी, प्रा.डॉ.विनोद जगतकर, काँग्रेसचे बाबु नंबरदार, विश्वनाथ गायकवाड, वैजनाथ सोळंके, रघुनंदन खरात, मनसेचे सुमंत धस, श्रीकांत पाथरकर, दिलीप जोशी, गणपत कोरे, सोपानराव ताटे, भारत ताटे, मुन्ना बागवाले, संगिता तुपसागर, कमल निंबाळकर, के.डी.उपाडे, लालाखा पठाण सह कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते. सूत्रसंचलन नगरसेवक गोपाळ आंधळे यांनी केले.

टॅग्स :BeedबीडAssembly Election 2019विधानसभा निवडणूक 2019parli-acपरळीDhananjay Mundeधनंजय मुंडेNCPराष्ट्रवादी काँग्रेस