शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

माझ्या पतीला टॉर्चर केलं गेलं, ते आत्महत्या करूच शकत नाहीत; मयत जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांच्या पत्नीचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2026 15:13 IST

बीड येथील वस्तू व सेवा कर कार्यालयातील सचिन नारायण जाधवर यांनी १७ जानेवारी रोजी कपिलधारवाडी परिसरात टोकाचे पाऊल उचलले होते.

बीड : "माझ्या पतीला गेल्या महिनाभरापासून प्रचंड मानसिक त्रास दिला गेला, ते कधीच आत्महत्या करू शकत नाहीत. माझ्या मुलाला किडनॅप करण्याचा प्रयत्न झाला, तसेच वाहनाला धक्का मारून शिवीगाळ करण्यात आली होती", असा खळबळजनक दावा मयत जीएसटी अधिकारी सचिन जाधवर यांच्या पत्नी मयुरी जाधवर यांनी केला आहे. या वक्तव्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलीस प्रशासनावरही त्यांनी निशाणा साधला आहे.

बीड येथील वस्तू व सेवा कर कार्यालयातील सचिन नारायण जाधवर यांनी १७ जानेवारी रोजी कपिलधारवाडी परिसरात टोकाचे पाऊल उचलले होते. त्यांच्याकडे सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये सहायक आयुक्त दिलीप फाटे यांनी दिलेल्या त्रासाचा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र, घटनेला आठवडा उलटूनही पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करत असल्याने मयुरी जाधवर यांनी शुक्रवारी कुटुंबीयांसह पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन न्यायाची मागणी केली.

मुलाच्या अपहरणाचा प्रयत्नमाध्यमांशी बोलताना मयुरी जाधवर यांनी धक्कादायक खुलासे केले. त्या म्हणाल्या की, "माझ्या पतीला महिन्यापासून वेगवेगळ्या माध्यमातून टॉर्चर केले जात होते. ते प्रचंड तणावात होते आणि त्यांनी आपण खूप 'डिस्टर्ब' असल्याचेही मला बोलून दाखविले होते. केवळ पतीलाच नाही, तर शाळेत गेलेल्या माझ्या मुलाचे काही मुले पाठवून अपहरण करण्याचा प्रयत्न झाला. ऑफिसच्या बाहेर त्यांच्या वाहनाला मुद्दाम धक्का मारून शिवीगाळ करण्यात आली. हे सर्व त्यांना मानसिकदृष्ट्या खच्ची करण्यासाठीच केले जात होते."

पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह"आम्ही वारंवार विनंती करूनही पोलीस आम्हाला मूळ सुसाईड नोट दाखवायला तयार नाहीत. आमची फिर्याद घेतली जात नाही. पोलिसांना नेमका कोणाचा दबाव आहे?" असा रोखठोक प्रश्न मयुरी जाधवर यांनी उपस्थित केला आहे. सचिन जाधवर यांच्या बंधूंनीही या प्रकरणात सुसाईड नोटमध्ये नाव असलेल्या दोषींवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.

बीड ग्रामीण ठाण्यात गोंधळपोलीस अधीक्षकांची भेट घेतल्यानंतर जाधवर कुटुंबासह इतर नातेवाईक व सामाजिक कार्यकर्ते बीड ग्रामीण ठाण्यात गेले. येथे गुन्हा दाखल करून घेण्यास टाळाटाळ केल्याने या लोकांनी पोलीस ठाण्याच्या दारातच ठिय्या मांडला. जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत उठणार नाही, असा पवित्रा घेतल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल करून घेतो, असे आश्वासन दिले.

English
हिंदी सारांश
Web Title : GST officer's wife alleges torture, denies suicide; demands justice.

Web Summary : GST officer Sachin Jadhav's wife claims torture led to his death, not suicide. She alleges harassment, a kidnapping attempt on their child, and police inaction, demanding immediate justice and a thorough investigation into the matter.
टॅग्स :Beed Crimeबीड क्राईम मराठी बातम्याGST Officeमुख्य जीएसटी कार्यालय