बीडमध्ये पत्नीचा गळा आवळून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:39 IST2021-09-12T04:39:17+5:302021-09-12T04:39:17+5:30

बीड : चारित्र्यावरील संशय व कौटुंबिक वादातून पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना शहरातील मोमीनपुरा भागातील मासूम कॉलनीत ११ ...

Murder by strangling wife in Beed | बीडमध्ये पत्नीचा गळा आवळून खून

बीडमध्ये पत्नीचा गळा आवळून खून

बीड : चारित्र्यावरील संशय व कौटुंबिक वादातून पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची घटना शहरातील मोमीनपुरा भागातील मासूम कॉलनीत ११ सप्टेंबर रोजी रात्री पावणे नऊ वाजता उघडकीस आली. दरम्यान, पत्नीला संपविल्यानंतर पतीने घराला कुलूप लावले व थेट पोलीस ठाणे गाठले. या थरारक घटनेने शहरात खळबळ उडाली.

शेख मल्लिका शेख याकूब (३८) असे मृत विवाहितेचे नाव आहे. शेख याकूब शेख खुदबुद्दीन याने मल्लिकाशी आठ वर्षांपूर्वी प्रेमविवाह केला होता. मल्लिकाचे माहेर माजलगाव आहे. दरम्यान, याकूबला तीन भाऊ आहेत. प्रेमविवाहानंतर काही वर्षांतच तो पत्नीसह मोमीनपुरा भागातील मासूम कॉलनीत राहायला गेला. तो मिस्त्रीकडे बिगारी काम करायचा तर पत्नी घरकाम करायची. त्यांना तीन मुले आहेत. तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. त्यामुळे पती -पत्नीत सतत वाद होत असत. ११ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठ वाजेच्या दरम्यान मुले घराबाहेर खेळत असतानाही दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. यात याकूबने आधी मल्लिकाचा गळा आवळला. त्यानंतर बेशुद्ध झालेल्या मल्लिकाचे तोंड उशीच्या साहाय्याने दाबले. यात तिचा मृत्यू झाला.

दरम्यान, पत्नीचा खून केल्यानंतर घराला कुलूप लावून याकूब थेट पेठ बीड ठाण्यात पोहोचला. त्याने पोलिसांना आपण पत्नीचा खून केल्याची माहिती दिली. यानंतर पोलीस निरीक्षक विश्वास पाटील, उपनिरीक्षक गंगाधर दराडे, राजेंद्र बनकर हे घटनास्थळी दाखल झाले.

Web Title: Murder by strangling wife in Beed