उधारी वसूल करून परळीत परतलेल्या मुनिमाची पाच लाखाची बॅग लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 7, 2023 17:39 IST2023-06-07T17:38:52+5:302023-06-07T17:39:42+5:30

परळीत बसस्थानकासमोरच्या रस्त्यावर झाली चोरीची घटना

Munima, who returned to Parli after recovering the loan, lost a bag worth five lakhs | उधारी वसूल करून परळीत परतलेल्या मुनिमाची पाच लाखाची बॅग लंपास

उधारी वसूल करून परळीत परतलेल्या मुनिमाची पाच लाखाची बॅग लंपास

परळी: येथील बसस्थानकासमोरच्या रस्त्यावरून चालत जाणाऱ्या मुनिमाच्या हातातील बॅग पाठीमागून आलेल्या मोपेडस्वारांनी हिसकावत पोबारा केला. या बॅगमध्ये चार लाख 90 हजार रुपये होते. ही घटना मंगळवारी रात्री घडली. 

रमेश ज्ञानोबा पाचनकर ( 58 रा. कडबा मार्केट परळी) हे एका व्यापाऱ्याकडे नोकरीस आहेत. या व्यापाऱ्याच्या विविध ठिकाणच्या उधारी वसुलीचे काम ते करतात. मंगळवारी रात्री विविध ठिकाणाहून वसुली करून पाचनकर रात्रीच्या सुमारास परळीत दाखल झाले. बसस्थानकाच्या समोरील रस्त्यावरून आझाद चौकाकडे ते चालत निघाले. याचवेळी पाठीमागून एका मोपेडवरून आलेल्या तिघांनी वेगाने येत पाचनकर यांच्या हातातील पैश्यांची बॅग हिसकावली व क्षणार्धात निघून गेले. या बॅगमध्ये चार लाख 90 हजार 860 रुपये एवढी रक्कम होती. 

याप्रकरणी पाचनकर यांनी शहर पोलिसांना दिलेल्या फिर्यादीनुसार अज्ञात तीन आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास शहर पोलीस ठाण्याचे सपोनि  भागर्व सपकाळ हे करीत आहेत.

Web Title: Munima, who returned to Parli after recovering the loan, lost a bag worth five lakhs

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.