शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

पालिका कर्मचाऱ्यांची उपासमार, तीन महिन्यांपासून वेतन रखडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:03 IST

बीड : येथील नगरपालिका कर्मचाऱ्यांना काम करूनही वेतन वेळेवर मिळत नसल्याने संताप व्यक्त होते. मागील तीन महिन्यांपासून वेतन रखडल्याने ...

बीड : येथील नगरपालिका कर्मचाऱ्यांना काम करूनही वेतन वेळेवर मिळत नसल्याने संताप व्यक्त होते. मागील तीन महिन्यांपासून वेतन रखडल्याने कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. शासनाकडून सहायक अनुदान मिळत नसल्याने या अडचणी निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.

बीड नगरपालिकेत जवळपास ५२५ कर्मचारी, अधिकारी कार्यरत आहेत. त्यांच्या वेतनासाठी पालिकेला महिन्याकाठी २ कोटी १० लाख रुपये रक्कम लागते; परंतु शासनाकडून पालिकांना सहायक अनुदान मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन होत नाही. त्यामुळे त्यांची उपासमार होते. कोरोनासारख्या काळात आणि इतर वेळेतही पालिकेतील प्रत्येक कर्मचारी स्वच्छता, पाणीपुरवठा, वीज या मूलभूत गरजा पुरविण्यासाठी दिवसरात्र धडपड करीत असतात; परंतु त्यांचेच वेतन वेळेवर होत नसल्याने संताप व्यक्त होत आहे. नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्याचे वेतन रखडल्याने कर्मचाऱ्यांची उपासमार होत असून तीव्र संताप व्यक्त होत आहे. हे वेतन लवकर अदा करावे, अशी मागणीही जोर धरू लागली आहे. दरम्यान, याबाबत मुख्याधिकारी डॉ. उत्कर्ष गुट्टे यांना संपर्क केला. ते म्हणाले, मी बैठकीसाठी औरंगाबादला आहे. थोडा वेळाने संपर्क साधतो; परंतु रात्री उशिरापर्यंत त्यांनी संपर्क साधला नाही.

पालिका कर्मचाऱ्यांची कायम उपेक्षाच

पालिका, नगर पंचायत कर्मचारी दिवसरात्र काम करतात; परंतु त्यांची वेतनासाठी कायम उपेक्षाच असते. इतर विभागाला वेळेवर वेतन दिले जाते; परंतु यांना कधीच वेळेवर वेतन मिळत नाही. त्यामुळे त्यांचे नियोजनही कोलमडते.

अशी आहे आकडेवारी

३५० पेन्शनर्स

५२५ कर्मचारी

२ कोटी १० लाख रुपये - वेतनासाठी लागणारी प्रतिमहिना रक्कम