मुंडे भगिनींनी दिली कोविड सेंटरला भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 04:24 IST2021-06-03T04:24:12+5:302021-06-03T04:24:12+5:30

यावेळी त्यांच्यासोबत खा. डाॅ. प्रीतम मुंडे, शांतीवनचे दीपक नागरगोजे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के होते. स्व. गोपीनाथ मुंडे ...

The Munde sisters visited the Kovid Center | मुंडे भगिनींनी दिली कोविड सेंटरला भेट

मुंडे भगिनींनी दिली कोविड सेंटरला भेट

यावेळी त्यांच्यासोबत खा. डाॅ. प्रीतम मुंडे, शांतीवनचे दीपक नागरगोजे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र म्हस्के होते.

स्व. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान, शांतीवन यांच्या संयुक्त विद्यमाने सिद्धेश्वर इंग्लिश स्कूलमध्ये मोफत कोविड सेंटर सुरू करून एका सेवायज्ञाला सुरुवात केली. या माध्यमातून अनेक जण आपला सहभाग नोंदवत आहेत. मुस्लिम बांधवांनी ईदनिमित्त रुग्णांना शिरखुरमा वाटप केला. सचिन जायभाये यांनी योगासाठी मॅट व मशीन, घोगस पारगावचे सरपंच देवा गर्कळ हे रोज रुग्णांसाठी हळददूध तसेच चहासाठी लागणारे दूध देतात. याशिवाय अनेकांचे योगदान मिळत असल्याची माहिती मिळाल्यावरून सर्वांचे कौतुक करत हीच सध्या गरज असल्याचे सांगून यातूनच आपण संस्कार आणि संस्कृती जतन करणार असल्याचे मत व्यक्त मुंडे यांनी व्यक्त केले.

यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ. मधुसूदन खेडकर, पिंपळनेरचे सरपंच बबनराव जायभाये, इंदूबाई गोल्हार, सरपंच देवा गर्कळ, मा. सभापती तथा वार्णीचे सरपंच बाबूराव केदार, पं. स. सदस्य प्रकाश खेडकर, रामदास बडे, एम. एन. बडे, दहिवंडीच्या सरपंच शीलाताई आघाव, बाजीराव सानप, ॲड. प्रकाश बडे, भारत खरमाटे, सुरेश उगलमुगले, सरपंच विठ्ठल वणवे, विवेक पाखरे, भागवत बारगजे, कालिदास आघाव आदींची उपस्थिती होती.

कोविड सेंटरनंतर मुंडे भगिनींनी रुग्णांसाठी असलेल्या स्वयंपाकगृहाला भेट देऊन समाधान व्यक्त करत दीपक नागरगोजे यांच्या नियोजनाचे कौतुक केले .

===Photopath===

020621\vijaykumar gadekar_img-20210601-wa0054_14.jpg

Web Title: The Munde sisters visited the Kovid Center