मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला : पंकजा मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 04:31 IST2021-05-17T04:31:40+5:302021-05-17T04:31:40+5:30

बीड : काँग्रेसचे नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनाने लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला आहे, अशा ...

Munde Saheb's darling young leader lost: Pankaja Munde | मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला : पंकजा मुंडे

मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला : पंकजा मुंडे

बीड : काँग्रेसचे नेते, खासदार राजीव सातव यांच्या निधनाने लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला आहे, अशा शब्दांत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी आपल्या शोकभावना व्यक्त केल्या.

सर्वसामान्य समाजासाठी धडपडणारा एक उमदा युवा नेता राजीव सातव यांच्या रूपाने आज आपण गमावला आहे. ज्या व्यक्ती आपले आयुष्य कष्टात घालवतात, त्यांना एका उंचीवर पोहोचविण्यासाठी अनेक हात लागतात आणि तो जेव्हा एका उंचीपर्यंत पोहोचतो तो अनेक जीवनांना स्पर्श करत असतो. अशा प्रवासाचे उदाहरण असलेल्या राजीव सातव यांचे कोरोनामुळे दुःखद निधन झाले. सातव आणि आमच्या कुटुंबाचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांच्या जाण्याने काँग्रेसने एक उमदा नेता गमावण्याबरोबरच मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला आहे, असा उमदा बहुजन नेता बनण्यासाठी खूप कष्ट लागतात. त्यांच्या निधनाबद्दल मी मनापासून दुःख व्यक्त करते. त्यांच्या जाण्याने मोठे नुकसान झाले आहे, असेही मुंडे म्हणाल्या.

...

सामान्य माणसांची नाळ जोडलेला नेता

खा. राजीव सातव यांनी युवा नेतृत्व म्हणून कमी वेळेत स्वतंत्र यशोगाथा निर्माण केली. त्यांच्या निधनाने मी व्यथीत झालो आहे. एक चांगला परममित्र गमावल्याचे दु:ख कायम मनात राहील. हिंगोली जिल्ह्यातील एका शहीद सैनिक पत्नीला सामाजिक न्याय विभागाच्या योजनेतून जमीन मिळावी, यासाठी माझ्याशी संपर्क करून त्यांंनी पाठपुरावा केला. त्यांच्या आग्रहास्तव विशेष बाब म्हणून त्या शहीद सैनिक पत्नीला आम्ही मदत केली. सामान्य माणसांच्या कामाची कणव सातव यांच्या कामातून दिसून येत असे.

-धनंजय मुंडे, सामाजिक न्यायमंत्री.

Web Title: Munde Saheb's darling young leader lost: Pankaja Munde