पावसामुळे रस्त्यावर चिखल; नागरिक त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:23 IST2021-07-21T04:23:13+5:302021-07-21T04:23:13+5:30
अस्वच्छतेमुळे नागरिकांची गैरसोय वडवणी : शहरातील अनेक प्रभागातील ठिकठिकाणच्या नाल्या तुंबल्या आहेत. कचराही साचला असून, दुर्गंधीमुळे या भागातील ...

पावसामुळे रस्त्यावर चिखल; नागरिक त्रस्त
अस्वच्छतेमुळे नागरिकांची गैरसोय
वडवणी : शहरातील अनेक प्रभागातील ठिकठिकाणच्या नाल्या तुंबल्या आहेत. कचराही साचला असून, दुर्गंधीमुळे या भागातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे नगरपंचायतने लक्ष देऊन स्वच्छता मोहीम राबवावी, अशी मागणी होत आहे.
धूर फवारणीची मागणी
वडवणी : पावसामुळे शहरात ठिकठिकाणी डबके साचले आहेत. त्यामुळे डासांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे गावात विविध आजारांचा फैलाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही ही बाब पाहता नगरपंचायतने गल्लोगल्लीत धूर फवारणी करावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करा
वडवणी : यावर्षी खरीप हंगामात सुरुवातीपासून पेरणीयोग्य पाऊस झाल्याने पिके सद्य:स्थितीत जोमात आहेत; मात्र कोवळी पिके ही वन्यजीव प्राण्यांच्या उपद्रवामुळे धोक्यात येत असल्याने शेतकऱ्यांमधून चिंतेचे वातावरण निर्माण होत असून, वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी मामला चिंचोटी पुसरा तिगाव साळींबा पिपरखेड आदी गावातील शेतकऱ्यांमधून होत आहे.