बीडच्या बप्पांचा दादांना फोन; अमोल मिटकरींच्या ट्विटवर काय म्हणाले बजरंग सोनवणे?

By सोमनाथ खताळ | Published: June 11, 2024 08:10 PM2024-06-11T20:10:55+5:302024-06-11T20:12:46+5:30

बीडचे खा. सोनवणे हे अजित पवारांच्या संपर्कात आहेत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

mp Bajrang Sonwane say on Amol Mitkari's tweet | बीडच्या बप्पांचा दादांना फोन; अमोल मिटकरींच्या ट्विटवर काय म्हणाले बजरंग सोनवणे?

बीडच्या बप्पांचा दादांना फोन; अमोल मिटकरींच्या ट्विटवर काय म्हणाले बजरंग सोनवणे?

बीड : बीडच्या बप्पाचा दादांना फोन असे टविट् अजित पवार गटाचे आ.अमोल मिटकरी यांनी मंगळवारी केले होते. यानंतर बीडचे नवनिर्वाचित खासदार बजरंग सोनवणे यांनी हा दावा धुडकावून लावत आपण मरेपर्यंत शरद पवार यांच्यासोबत राहू, असे स्पष्ट केले आहे. अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी 'बीडच्या बप्पाचा दादांना फोन' अशा आशयाचे ट्वीट केले होते. यामुळे बीडचे खा. सोनवणे हे अजित पवारांच्या संपर्कात आहेत का? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती.

शिवसेनेप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतही खासदार फुटीची भीती आहे का, असा सवाल उपस्थित केला जात होता. मात्र, या प्रकरणावर बजरंग सोनवणे यांनी स्पष्टीकरण देत, मी मरेपर्यंत शरद पवार यांच्यासोबतच राहणार, असे स्पष्ट केले आहे. मिटकरी यांनी लोकसभेमध्ये किमान एखादा खासदार निवडून आणायला हवा होता. त्यानंतर त्यांनी दुसऱ्याच्या बाबतीत बोलावे. आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत शरदचंद्र पवार यांच्यासाेबतच आपण राहणार असून असे संभ्रम निर्माण करण्याचे प्रकार मिटकरी यांनी बंद करावेत, त्यांनी आधी एखादा ग्रामपंचायतचा सदस्य निवडून आणावा, असा टोलाही सोनवणे यांनी लगावला.

काय म्हणाले सोनवणे...

'मी फोन करण्याचा संबंध कुठे येतो. ते असा संभ्रम का पसरवत आहेत, हे त्यांनाच विचारायला हवे. ते महाराष्ट्रातील जनतेला कनफ्युज का करत आहेत. या राजकारणाच्या प्रक्रियेमध्ये वैयक्तिक विचार असतात, ते तुम्ही राजकारणात आणत आहात. हे मिटकरी अतिशय चुकीचं करत आहेत. मिटकरींना माझी विनंती आहे की, ते आमदार झालेत ते डायरेक्टली झालेत. आता त्यांना पक्षाने काय पद दिले आहे, हे मला माहित नाही, त्यांनी एकदा जनतेतून निवडून यावे आणि त्यानंतर दुसऱ्यांच्या उष्टीला हात घालावा, ही विनंती आहे. मी जिवंत असेपर्यंत मी शरद पवार यांच्यासोबतच राहणार', असे स्पष्टीकरण सोनवणे यांनी दिले आहे.

Web Title: mp Bajrang Sonwane say on Amol Mitkari's tweet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.