लोकमत न्यूज नेटवर्कबीड : बीड जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत असून प्रभावी उपाययोजना होत नाहीत. दुष्काळाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राजेंद्र मस्के मित्र मंडळाच्या वतीने १६ नोव्हेंबरपासून पिंपळ गव्हाण (ता. बीड) येथील धरणामध्ये गुराढोरांसह शेतकऱ्यांनी धरणेआंदोलन सुरू केले आहे. बीड जि.प.च्या उपाध्यक्षा जयश्री मस्के आणि मित्रमंडळाचे अध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे.शासनास दिलेल्या निवेदनात मस्के यांनी म्हटले की, लोकशाही पद्धतीच्या आंदोलनाची दखल घेऊन सरकारला उपाययोजना करण्यासंबंधीच्या सूचना कराव्यात अशी विनंती त्यांनी जिल्हा प्रशासनाला केली आहे. बीड जिल्ह्यासह बीड तालुक्यामध्ये भयानक असा दुष्काळ पडलेला आहे. दुष्काळी परिस्थिती शासनाने जाहीर केली आहे. परंतु दुष्काळी उपाययोजनेचा शेतकºयाला आजतागायत फायदा मिळत नाही. ग्रामीण भागामध्ये पिण्याच्या भागांमध्ये पिण्याच्या पाण्याची भीषण अशी टंचाई निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. ग्रामपंचायतने शासनाकडे टँकरची मागणी करून एक महिना एवढा कालावधी लोटला. परंतु, टँकर मंजुरीच्या प्रस्तावास विलंब होत आहे. टँकर मंजुरीचा अधिकार तहसीलदार यांना द्यावेत, असेही निवेदनात म्हटले आहे.तसेच गुरांच्या चाºयाची देखील टंचाई मोठ्या प्रमाणात झाली आहे. खरीपाच पिक हाती न लागल्यामुळे शेतकºयाकडे कसल्या प्रकारचा चारा शिल्लक नाही असे असताना कृषी अधिकारी यांनी तीन-चार महिने पुरेल एवढा चारा उपलब्ध असल्याची संबंधीचा अहवाल शासनाला दिला आहे यामुळे शेतकºयावरती अन्याय झाला आहे.शेतकºयाला हेक्टरी ५० हजारांची आर्थिक मदत जाहीर करावी, पीक कर्ज माफ करावे, पिण्याच्या पाण्याचे टँकर तात्काळ मंजूर करावेत, गुरांचा चारा व पाण्यासाठी शेतकºयांना तात्काळ अनुदान द्यावे आदि मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येत आहे.
धरणामध्ये गुराढोरांसह धरणे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 00:18 IST
बीड जिल्ह्यात दुष्काळाची दाहकता वाढत असून प्रभावी उपाययोजना होत नाहीत. दुष्काळाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी राजेंद्र मस्के मित्र मंडळाच्या वतीने १६ नोव्हेंबरपासून पिंपळ गव्हाण (ता. बीड) येथील धरणामध्ये गुराढोरांसह शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. बीड जि.प.च्या उपाध्यक्षा जयश्री मस्के आणि मित्रमंडळाचे अध्यक्ष राजेंद्र मस्के यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे.
धरणामध्ये गुराढोरांसह धरणे आंदोलन
ठळक मुद्देबीड जिल्ह्यातील शेतकरी कुुटुंबासह सहभागी : दुष्काळ निवारणार्थ ठोस उपाययोजना करा - राजेंद्र मस्के