मोटारसायकलची चोरी - A
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST2021-07-02T04:23:12+5:302021-07-02T04:23:12+5:30
रानडुकरांचा त्रास चौसाळा : पहिल्या टप्प्यात पेरणी झालेली पिके आता वाढीस लागली असून, रानडुकरांचा त्रास वाढला आहे. पिकांची नासाडी ...

मोटारसायकलची चोरी - A
रानडुकरांचा त्रास
चौसाळा : पहिल्या टप्प्यात पेरणी झालेली पिके आता वाढीस लागली असून, रानडुकरांचा त्रास वाढला आहे. पिकांची नासाडी होत आहे. बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
कठडे गायब
तेलगाव : तालुक्यात अनेक ठिकाणी पुलांना बसविण्यात आलेले लोखंडी कठडे गायब झाले आहेत. अंधारात अनेकदा अपघात झाले. वाहनांना पुलावरून जाताना धोका निर्माण होत आहे.
वीज ग्राहकांची तक्रार
बीड : वीज बिल जास्त येत असल्याची वीज ग्राहकांची तक्रार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून जे वीज बिल दिले जात आहे, ते अनेकदा रीडिंग न घेताच दिले जाते. ग्रामीण भागात तर हा प्रकार सर्रास सुरू आहे. अंदाजे रीडिंग घेत असल्यामुळे वीज बिल मोठ्या प्रमाणात येत आहेत.
अवैध धंद्याकडे दुर्लक्ष
नेकनूर : नेकनूर परिसरात अवैध धंदे सुरू असून, पोलिसांचे त्याकडे दुर्लक्ष होत आहे. अवैध वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण वाढले आहे. हॉटेल, पानटपरी, तसेच शेडमध्ये मोठ्या प्रमाणावर मटका, जुगार खेळविला जातो, तसेच अवैधरीत्या दारूची विक्री होत आहे. याकडे यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे.