शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

महिला सरपंचांसह सासू, सासऱ्यांची घरात राहूनच कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 10, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शिरूर कासार : महिला सरपंचासह वयस्कर सासू, सासरे व घरातील सहा सदस्य वीस दिवसांपूर्वी कोरोनाने बाधित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

शिरूर कासार : महिला सरपंचासह वयस्कर सासू, सासरे व घरातील सहा सदस्य वीस दिवसांपूर्वी कोरोनाने बाधित झाले होते. या सर्वांनी घरात राहूनच प्रबळ इच्छाशक्तीने व उपचार करून कोरोनावर मात केली. आज सर्वांची प्रकृती ठणठणीत आहे.

शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडी हे १५०० लोकवस्तीचे गाव शिरूरपासून अवघ्या अडीच किलोमीटरवर आहे. शीलावती मोरे या येथील सरपंच आहेत. येथील नागरिकांची सतत शहरात वर्दळ असते. कोरोनाचा गावात देखील शिरकाव झाला. यातून गाव सुरक्षित ठेवण्यासाठी सरपंच मोरे यांंनी विविध उपाययोजना केल्या होत्या. कोरोनाबाबत जनजागृती करून नियम पाळण्याचे आवाहन केले जात होते, तरीदेखील झापेवाडीत कोरोनाचा शिरकाव झालाच. १९ लोकांना कोरोनाने बाधले होते. यावेळी थेट सरपंचासह घरचे सहा सदस्य बाधित झाले. बापूराव मोरे व त्यांची पत्नी वयस्कर असल्याने चिंता वाटत होती. मात्र, त्यांनी हिंमत सोडली नाही. आपण सर्वजण यातून सहीसलामत सुटू, असा आत्मविश्वास धरून घरातच सर्वजण अलगीकरणात राहिले. नित्य औषधींसह गरम पाणी, वाफ, काढा यासोबतच सकस आहारावर भर दिला. परिणामी कोरोनाला हरवण्यात त्यांनी यश मिळवले. मात्र, गावातील एकाला मृत्यूने गाठलेच. त्याचे दुःख झाले.

...

ग्रामस्थांमुळे मनोधैर्य वाढले

गावाच्या बाहेर वस्तीवर शीलावती मोरे यांचे घर आहे. गावची जशी काळजी होती. तशी कुटुंबाची होती. वयस्कर सासू-सासऱ्यांची जबाबदारी होतीच. पती गोकुळ मोरे यांच्या सहकार्याने व वेळोवेळी वैद्यकीय सल्ला घेऊन कोरोनावर मात केली. त्यामुळे गावातील सर्वांचे मनोधैर्य वाढण्यास मदत झाली, असे सरपंच मोरे यांनी सांगितले.

...

कोरोना झाला म्हणून आम्ही घाबरलो नाही, तर परमेश्वरावरचा विश्वास ठेवत या वयातही मनोधैर्य खचू न देता सामोरे गेलो. यातून सहीसलामत बाहेर आलो. घाबरून न जाता योग्य उपचार व नियमांचे पालन केल्यास कोरोनातून बरे होता येते, असे बापूराव मोरे यांनी सांगितले.

....

घरात एकाच वेळी सासू, सासरे व अन्य सहा सदस्य पाॅझिटिव्ह निघाले. थोडी घबराट झाली. मात्र, कुटुंब व गावची प्रमुख ही जबाबदारी ओळखून धैर्य खचू न देता सामोरे गेलो. घरातच विलगीकरणात राहून घरीच उपचार करून कोरोनामुक्त देखील झालो. कोरोनाची बाधा होऊच नये, यासाठी असलेली नियमावली पाळण्याचे आवाहन सरपंच शीलावती मोरे यांनी केले.

..

फोटो ओळी-शिरूर कासार तालुक्यातील झापेवाडी येथील कोरोनातून बरे झालेले सरपंच शीलावती मोरे यांचे कुटुंब.

===Photopath===

090521\vijaykumar gadekar_img-20210508-wa0018_14.jpg