गच्चीवर सुरू झालाय मॉर्निंग व इव्हिनिंग वॉक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:20 IST2021-07-24T04:20:05+5:302021-07-24T04:20:05+5:30
कोरोनाची भिती अंबेजोगाई : कोरोनाच्या संसर्गापासून दूर राहता यावे, गर्दी टाळता यावी, यासाठी अंबेजोगाई शहरातील अनेक महिला व नागरिकांनी ...

गच्चीवर सुरू झालाय मॉर्निंग व इव्हिनिंग वॉक
कोरोनाची भिती
अंबेजोगाई : कोरोनाच्या संसर्गापासून दूर राहता यावे, गर्दी टाळता यावी, यासाठी अंबेजोगाई शहरातील अनेक महिला व नागरिकांनी आपल्या घराच्या गच्चीवरच मॉर्निंग व इव्हिनिंग वॉकला पसंती दिली आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. अजूनही कडक नियम लागूच आहेत. त्यामुळे प्रत्येक नागरिकांना घरी राहण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. दरम्यान, पोलीस प्रशासनाकडूनही रस्त्यावर काम नसताना फिरणाऱ्यांचा चांगलाच समाचार घेतला जात आहे. त्यामुळे बहुतांश नागरिक घराच्या गच्चीवर फिरत असल्याचे चित्र शहरासह ग्रामीण भागात आहे. कोरोनामुळे मार्निंग वॉकला जाणाऱ्यांची संख्याही कमी झाली आहे. अंबेजोगाई तालुक्यात या वर्षी पावसाळा सुरू झाल्यापासून सतत पाऊस सुरूच आहे. त्यामुळे घराबाहेर पडणे महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी अवघड ठरते, तर सार्वजनिक ठिकाणी मैदानावर सततच्या पावसामुळे चिखल झाल्याने फिरता येईना, शिवाय या ठिकाणी चिखल झाल्यास फिरताना अपघाताचा संभाव्य धोका आहे, तसेच रोडवर फिरायचे, तर सतत वाहनांची वर्दळ, रस्त्यावर होत असलेली गर्दी, यातून उद्भवणारा कोरोनाचा संसर्ग हे सर्व टाळण्यासाठी अनेकांनी आपल्या घराच्या गच्चीचाच आधार मॉर्निंग व इव्हिनिंग वॉकसाठी घेतला आहे. शहरात सकाळी व संध्याकाळी अनेक जण गच्चीवर फिरताना आढळून येत आहेत.