शहरं
Join us  
Trending Stories
1
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
2
जे विष वापरून ट्रम्प यांच्या हत्येचा कट रचला, तेच विष बनवणाऱ्या डॉक्टरवर ATS ला संशय कसा आला?
3
लेन्सकार्टच्या गुंतवणूकदारांना मोठा झटका! IPO ला बंपर प्रतिसाद, पण लिस्टिंगनंतर शेअर कोसळला
4
भारताविरोधात बायो केमिकल शस्त्राचा वापर; गुजरातच्या दहशतवाद्याकडून 'रिसिन' जप्त, किती खतरनाक?
5
कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का?
6
११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी
7
कोण आहे डॉक्टर आदिल अहमद राठर? ज्याच्या खुलाशातून जप्तकरण्यात आली 350 किलो स्फोटकं अन् AK-47
8
'पंचायत' फेम जितेंद्र कुमारच्या आगामी सिनेमाची घोषणा, 'ही' अभिनेत्री साकारणार आईची भूमिका
9
“कोरेगाव प्रकरणात जमीन परत केली तरी पार्थ पवारांवर कारवाई झालीच पाहिजे”; काँग्रेसची मागणी
10
हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत...
11
"हे निर्लज्ज लोक तुमच्या यशातही..." गावसकरांनी विश्वविजेत्या लेकींसोबत शेअर केला आपला वाईट अनुभव
12
मनसे-मविआची दिलजमाई! ‘या’ ठिकाणी एकत्र निवडणूक लढणार; नेते म्हणाले, “महायुतीला आता शह...”
13
...म्हणून महामुंबईच्या ९ महापालिका भाजपला हव्यात
14
Video - अबब! थारमधून नोटांचा पाऊस, पैसे गोळा करायला लोकांची मोठी झुंबड
15
अनेक ठिकाणी भीषण केमिकल हल्ल्याची योजना; गुजरात ATS ने ISKP संघटनेचा कट उधळला
16
जिओ-एअरटेलमध्ये खळबळ! BSNL लवकरच आपली ५जी सेवा सुरू करणार, 'या' शहरांपासून सुरुवात
17
भूतकाळातील गूढ, थरारक घटना; मराठीतील रहस्यपट 'असंभव'चा ट्रेलर चुकवू नका
18
“मनसे काँग्रेससाठी समविचारी पक्ष नाही, त्यामुळे सोबत घेण्याचा प्रश्नच नाही”; कोणी केला दावा?
19
४२ फेऱ्या, ५९ हजार प्रवासी अन् ६.२१ कोटींची कमाई; ‘या’ वंदे भारत ट्रेनची रेकॉर्डब्रेक कामगिरी
20
माली देशात पाच भारतीय नागरिकांचे अपहरण; केंद्र सरकारने दिली महत्वाची माहिती...

'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 19:11 IST

महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही : अजित पवार

- संजय खाकरेपरळी: महिलांच्या सक्षमीकरणासाठी व आत्मसन्मानासाठी महायुती सरकारने सुरू केलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना बंद पडू देणार नाही. पुढील पाच वर्ष ही चालू राहील असा शब्द राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परळी  (जिल्हा बीड)येथे जन सन्मान यात्रेच्या  सभेप्रसंगी दिला.तसेच भाऊबीजेची ओवाळणी म्हणून लाडकी  बहीण योजनेचे ऑक्टोबर व नोव्हेंबर या महिन्याचे  तीन हजार रुपये दहा ऑक्टोबर रोजी लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होतील अशी घोषणाही याप्रसंगी उपमुख्यमंत्री पवार यांनी केली. 

मंगळवारी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसन्मान यात्रेचे परळी शहरात जोरदार स्वागत करण्यात आले. त्यानंतर येथील वैद्यनाथ महाविद्यालयासमोरील प्रांगणात आयोजित करण्यात आलेल्या लाडकी बहिणी व  नागरिकांच्या संवाद सभेत अजितदादा बोलत होते. याप्रसंगी राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित दादा पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे, आमदार विक्रम काळे ,अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी, अडवोकेट विष्णुपंत सोळंके, राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर  चव्हाण , गोविंदराव देशमुख, बबन लोमटे, फारुख पटेल, शिवाजी सिरसाट, परळी नगरपरिषदेचे माजी गट नेते वाल्मीक कराड,  माजी नगराध्यक्ष दीपक देशमुख, बाजीराव धर्माधिकारी, राजाभाऊ पौळ, लक्ष्मण पौळ, वैजनाथ सोळंके, सुशांत पवार, संध्या सोनवणे, संगीता तूपसागर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जनसमान यात्रेचे शहरात वाजत गाजत स्वागत करण्यात आले त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या सभेत उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी विरोधकांचा समाचार घेतला. ते म्हणाले, ''मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजना आम्ही सुरू केल्याने विरोधकांना मळमळ होत आहे. परंतु आम्ही ही योजना यापुढे चालूच ठेवणार आहे. भाजप -शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महायुती सरकारने गोरगरिबांच्या कल्याणासाठी, शेतकरी, शेतमजुरांच्या हितासाठी, महिला-मुलींसाठी, होमगार्डसाठी व समाजातील प्रत्येक घटकाच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. यापुढेही विकासासाठी केंद्र सरकारची मदत घेण्यात येईल.बीड जिल्ह्याच्या विकासासाठी आपण कटिबद्ध आहोत. बीडला विमानतळ करण्यात येईल त्यामुळे जिल्ह्यात उद्योगधंदे वाढतील व बेरोजगारांच्या हाताला काम मिळेल'', असा विश्वास ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला आहे. 

याप्रसंगी खासदार सुनील तटकरे यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना आगामी निवडणुकित पुन्हा महायुतीची सत्ता आणण्यासाठी राज्याच्या प्रचाराची जबाबदारी देण्यात येणार असल्याची माहिती दिली. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या  भाषणातून बीड जिल्ह्यातिल महायुतीचे सहाही उमेदवार निवडून आणण्याचा संकल्प केला आहे. आगामी निवडणुकीसाठी मला टार्गेट केले जात आहे. परंतु परळी मतदारसंघातील मतदार माझ्या पाठीशी आहेत त्यामुळे मी या मतदारसंघातून जिंकून येणारच आहे असा विश्वासही कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी याप्रसंगी बोलताना दिला. 

दोन हप्त्यांच्या रकमेतून सुरू केला व्यवसायदरम्यान मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या दोन हप्त्यांच्या रकमेतून स्वतःचा व्यवसाय सुरू करून एक आठवड्यात १२ हजार रुपयांचा नफा मिळवणाऱ्या परळी येथील नेहरु चौकातील अक्षरा अक्षय शिंदे या महिलेचा अजित पवार व मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे. आर्टिफिशियल वटवृक्ष तयार करण्याचा व्यवसाय अक्षरा शिंदे यांनी सुरू केला आहे. त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या भाषणातून त्यांचे कौतुक केले. आभार प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांनी केले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाDhananjay Mundeधनंजय मुंडेBeedबीड