सिमरी पारगाव येथे फिरते वाचनालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST2021-07-02T04:23:37+5:302021-07-02T04:23:37+5:30
पात्रुड : गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू आहे; पण खेड्यातील, वाडी, वस्ती, तांड्यावरील मुलं ...

सिमरी पारगाव येथे फिरते वाचनालय
पात्रुड : गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद आहेत. सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू आहे; पण खेड्यातील, वाडी, वस्ती, तांड्यावरील मुलं यापासून वंचित आहेत. त्यांचा शिक्षणाचा खंड भरून काढण्यासाठी व शिक्षणाच्या प्रवाहात मुलांना टिकवून ठेवण्यासाठी हा छोटासा प्रयत्न यशस्वी सेवाभावी संस्था करीत आहे. सिमरी पारगाव येथे गावकऱ्यांसाठी वाचनालय चालू करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन नीळकंठ भोसले (कृउबास संचालक) यांनी केले. यावेळी संयोजक मयुर कांबळे, दामोदर घायतिडक, आबाजी भोसले (उपसरपंच), कमलाकर कोरडे, सुनील मानमोडे, सतेश कांबळे, सोमनाथ कांबळे, प्रकाश कोरडे, महेश भोसले, दत्ता सुरवसे, हनुमंत जाधव, अशोक कोरडे, दत्ता घायतिडक, पवन कांबळे, भारत पाटील, राजेभाऊ कोरडे, आकाश कांबळे, प्रदीप उजगरे व सर्व गावकरी उपस्थित होते.
300621\513630_2_bed_5_30062021_14.jpg
वाचनालय