पाटोद्यात नापिकीला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2018 19:04 IST2018-03-15T19:02:56+5:302018-03-15T19:04:18+5:30
तांबाराजूरी येथील एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आले.

पाटोद्यात नापिकीला कंटाळून अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या
पाटोदा ( बीड ) : तालुक्यातील तांबाराजूरी येथील एका शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे आज सकाळी उघडकीस आले. मागील काही दिवसांपासून ते अल्प शेती व सततची नापिकी याने आर्थिक विवंचनेत होते.
विष्णू दिगंबर तांबे (55) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ते अल्पभुधारक शेतकरी आहेत. त्यांचे नावावर सव्वादोन एकर जमीन आहे. त्यांच्यानावे खाजगी सावकाराचे कर्ज असल्याची माहिती आहे. सततच्या नापिकीने ते आर्थिक विवंचनेत होते. यामुळे कुटुंबाचा भार असह्य झाल्याने बुधवारी रात्री त्यांनी स्वतःच्या शेतातील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. आज सकाळी हा प्रकार उघडकीस आला.
याप्रकरणी पाटोदा पोलिसात अकस्मात मॄत्यूची नोंद करण्यात आली असून सुभाष मोटे अधिक तपास करत आहेत.