कामावर नसलेल्या मजुरांच्या नावे उचलले लाखो रुपये ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 23:53 IST2019-06-28T23:52:11+5:302019-06-28T23:53:14+5:30
येथील सामाजिक वनीकरण विभागाने तालुक्यात वनीकरणाच्या सारणी (आ) येथील रोपवाटिकेत कामावर नसलेल्या मजुरांच्या नावावर लाखो रुपयांची रक्कम उचलली असल्याने त्या वीस मजुरांनी केजच्या सामाजिक वनीकरण विभागाचे असे कोणती कामे केली होती, ज्याच्या मोबदल्यात ही रक्कम परजिल्ह्यातील मजूरांच्या नावे अदा करण्यात आली असा सवाल उपस्थित होत आहे.

कामावर नसलेल्या मजुरांच्या नावे उचलले लाखो रुपये ?
दीपक नाईकवाडे ।
लोकमत न्यूज नेटवर्क
केज : येथील सामाजिक वनीकरण विभागाने तालुक्यात वनीकरणाच्या सारणी (आ) येथील रोपवाटिकेत कामावर नसलेल्या मजुरांच्या नावावर लाखो रुपयांची रक्कम उचलली असल्याने त्या वीस मजुरांनी केजच्या सामाजिक वनीकरण विभागाचे असे कोणती कामे केली होती, ज्याच्या मोबदल्यात ही रक्कम परजिल्ह्यातील मजूरांच्या नावे अदा करण्यात आली असा सवाल उपस्थित होत आहे.
केज येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या केज येथील वन परिक्षेत्र अधिकारी यांनी तालुक्यात वृक्ष लागवडीसह रोपवाटिकेतील पिशव्यात माती भरण्यासाठी व माती भरलेल्या पिशव्यांमध्ये बियाणे टाकण्यासाठी स्थानिक मजुरांना दूर ठेवत, बाहेर जिल्ह्यातील मजूर कामावर नसताना त्यांच्या नावे करोडो रुपयांची बिले उचलून भ्रष्टाचार केल्याच्या तक्रारी लोकप्रतिनिधींकडून करण्यात आल्या आहेत.
येथील सामाजिक वनीकरणच्या वन परिक्षेत्र अधिकाºयाने आपल्या पदाचा गैरवापर करत सारणी (आ) येथील रोपवाटिकेत कामावर नसलेल्या व बाहेरच्या जिल्ह्यातील मजुरांच्या नावे लाखो रुपयांची मजुरीचे पैसे उचलेले आहेत.
दरम्यान, हे मजूर कामाला नसल्याचे तक्रारीत नमूद केले आहे, तसेच या मजुरांनी सामाजिक वनीकरणच्या वृक्ष लागवडीसह रोपवाटिकेत अशी कोणती कामे केल्याने त्यांना त्यांच्या कामाच्या मजुरीपोटी लाखो रुपये देण्यात आले असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
दरम्यान केज येथील सामाजिक वनीकरण विभागाच्या वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी तालुक्यात वृक्षलागवडीच्या कामात कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार राष्ट्रवादी कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा जि. प. सदस्य बजरंग सोनवणे यांनी मुख्य वनसंरक्षक सामाजिक वनीकरण विभाग औरंगाबाद यांच्याकडे केली आहे.
मात्र, केज येथील सामाजिक वनीकरण विभागात करण्यात आलेल्या कोट्यावधी रुपयांच्या भ्रष्टाचारात सामाजिक वनीकरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचा आरोप तक्रारीत केल्याने या भ्रष्टाचाराची सखोल चौकशी होऊन दोषींवर कारवाई होईल का असा सवाल उपस्थित होत आहे.