मध्यरात्री काळाची झडप; अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरुण ठार, एक जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 11:06 AM2021-09-22T11:06:15+5:302021-09-22T11:07:44+5:30

Accident In Beed : मृतात एक विद्यार्थी व सलून व्यावसायिकाचा समावेश तर जखमीत प्रशिक्षणार्थी पोलीस

Midnight time accident; Two youths were killed and one was injured in an unidentified vehicle collision | मध्यरात्री काळाची झडप; अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरुण ठार, एक जखमी

मध्यरात्री काळाची झडप; अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन तरुण ठार, एक जखमी

Next

केज ( बीड ) : शहराच्या मध्य भागातील कानडी रस्त्यालगत मध्यरात्री १:०० च्या दरम्यान झालेल्या अपघातात अज्ञात वाहनाच्या धडकेत दोन युवक जागीच ठार तर एक प्रशिक्षणार्थी पोलीस जवान जखमी झाला आहे. सुजित राऊत आणि सुमित सिरसाट अशी मृतांची नावे आहेत.


या बाबतची माहिती अशी की, दि. २२ सप्टेंबर रोजी मध्यरात्री १:०० वा. च्या दरम्यान सुजित सुरेश राऊत वय २० वर्ष, रा. सुमित संदीपान सिरसट वय १८ वर्षे दोघे रा फुले नगर केज व गडचिरोली येथे पोलीस प्रशिक्षण घेत असलेले विजयकुमार पांडुरग घोळवे रा. समता नगर केज हे मोटार सायकलवर (एमएच-४४/एम-२३०३) घराकडे जात होते. शहराच्या मध्य भागातून जात असलेल्या केज-बीड महामार्गावर कानडी रोडवरील कांचन मेडिकल समोर एका अज्ञात वाहनाने मागील बाजूने धडक दिली. यात सुजित राऊत व सुमित सिरसट  जागीच ठार झाले. अपघाता नंतर मोटार सायकल सुमारे १०० ते १५० फूट फरफटत नेली. तर विजयकुमार पांडुरग घोळवे यांच्या उजव्या पायाला व डोक्याला मार लागून गंभीर जखमी झाले आहेत. अपघात एवढा गंभीर होता की, रस्त्यावर रक्त मासाचा सडा पडला होता.

अपघाताची माहिती मिळताच सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मिसळे, पोलीस उपनिरीक्षक दादासाहेब सिद्धे, रमेश सानप, बाळासाहेब अहंकारे व चालक हनुमंत गायकवाड हे घटनास्थळी हजर झाले. त्यांनी मृतदेह व जखमी व्यक्तीस उपजिल्हा रुग्णालयात भरती केले.

अपघातात मृत्यू पावलेला सुमित संदिपान सिरसट हा या वर्षी इयत्ता १२ वी परीक्षा उत्तीर्ण झाला होता व दि. २१ रोजी त्याने अंबाजोगाई येथे MH-CET परीक्षा देऊन आला होता. सुजित सुरेश राऊत याचे एक वर्षा पूर्वी लग्न झाले असून तो केश कर्तनालयात काम करीत आहे. जखमी विजयकुमार पांडुरंग घोळवे वय ३५ या संरक्षण सेवेतून सेवा निवृत्त झाला असून त्या नंतर तो गडचिरोली येथर पोलीस सेवेत भरती झालेला असून तो वैद्यकीय रजेवर गावाकडे केज येथे आलेला आहे.

अपघात कसा घडला असावा ? 
या अपघाता बाबत अनेक तर्क वितर्क वर्तविण्यात येत आहेत. सुजित राऊत व सुमित राऊत हे घराकडे येत असताना रस्त्यात त्यांना विजयकुमार घोळवे हा पायी येत असावा. म्हणून त्यांना गाडीवर बसवून तिघे घराकडे जात असावेत.  त्यांना मागून येणाऱ्या अज्ञात वाहनाने धडक दिली असावी किंवा सुजित राऊत व सुमित सिरसट हे दोघे बस स्टँड कडून घराकडे जात असताना रस्त्यात पायी चालत जाणारा विजयकुमार घोळवे हा त्यांना धडकला असावा. यात ते मोटार सायकलवरून खाली पडले. त्याच वेळी मागून येणाऱ्या वाहनाने त्यांना धडक दिली असावी असावी. असा अंदाज आहे.

Web Title: Midnight time accident; Two youths were killed and one was injured in an unidentified vehicle collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app