Meters in the dark, figures in the light | मीटरवाले अंधारात, आकडेवाले उजेडात

मीटरवाले अंधारात, आकडेवाले उजेडात

लोकमत न्यूज नेटवर्क
नांदुरघाट : येथे नांदुरघाट येथे वीजचोरीचे प्रमाण वाढल्यामुळे वसुली कमी व वीज दुप्पट यामुळे कर्मचारी देखील त्रस्त झाले होते. वारंवार ग्राहकांना सांगून सुद्धा वीज बिल भरत नसल्यामुळे शनिवारी अभियंता राजेश आंबेकरसह युसुफ वडगावचे अभियंता सचिन चव्हाण व ग्रामीण चे इंजिनियर अमोल मुंडे यांच्यासह तालुक्यातील ४० लाईनमेन व कर्मचारी सकाळपासून दिवसभर घरोघरी फिरून मीटर तपासणी तसेच घरात विज आहे ती कुठून आली याचा तपास करत होते.
यावेळी बहुतांश गावातील आकडेबहाद्दरांचे वायर जप्त करून त्यांच्यावर नोटिसा बजावल्या. अनधिकृत वीज वापरणाऱ्यांविरुद्ध कारवाई केली जाईल. त्यांनी दंडाची रक्कम तात्काळ न भरल्यास फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल केले जातील, असे कर्मचाऱ्यांनी सांगितले. महावितरणच्या कारवाईमुळे वीजचोरी करºयांची धावपळ झाली. पाच ते सहा महिन्यापूर्वी अशीच कारवाई करून लाखो रुपयांचा दंड वसूल केला होता. त्याचाही वीज चोरीवर कोणता परिणाम झाला नाही म्हणून ही मोठी कारवाई करण्यात आली.
नांदुर घाट मध्ये एकूण १२६९ वीज मीटर ग्राहक होते. गेल्या २-३ वर्षांत वीज बिल न भरणा-या ५९८ ग्राहकांचे मीटर महावितरणतर्फे काढण्यात आले. सध्या नांदुरघाट मधील ६७१ वीज मीटरधारकांपैकी २५-३० टक्केच थकबाकीदार आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ५९८ घरांची वीज तोडली मग ते घर स्थलांतरित झाले का त्यांच्या घरात वीज नाही का हे प्रत्यक्ष पाहण्यासाठी सर्व वीज वितरण कर्मचारी आज नांदुरघाट मध्ये ठाण मांडून होते. प्रत्यक्ष पाहणीत मीटरवाले अंधारात आणि आकडेवाले उजेडात, अशी स्थिती पाहावयास दिसून आली.
थकबाकीच्या रकमेचे हप्ते पाडून थोडे-थोडे भरून मीटर चालू करा. नसता मोठ्या दंडाला व कारवाईला सामोरे जा, असा इशारा यावेळी अभियंता राजेश आंबेकर यांनी ग्रामस्थांना दिला. ज्यांना मीटरच नाही अशा ग्राहकांना दोन दिवसात मीटर बसून सुरळीत वीज पुरवठा केला जाईल असे आंबेकर यांनी सांगितले. ५९८ थकबाकीदार ग्राहकांनी त्यांच्या सोयीनुसार थोडी-थोडी रक्कम जर भरली नाही तर लवकरच त्यांच्या घरासमोर हलगी वाजवून वसुली केली जाईल. तरीदेखील देत नसतील तर वसुली साठी लागणारा खर्च दंड व फौजदारी गुन्हे दाखल केले जातील असे देखील सांगण्यात आले.
नांदूर घाट मध्ये प्रत्येक महिन्याला एक ट्रांसफार्मर जळाल्याने कायम एक भाग अंधारात असतो यापुढे चोरणारा वर कडक कारवाई केली जाईल नांदुर घाट साठी स्पेशल एक पथक नेमले आहे. हे पथक संध्याकाळी प्रत्येकाच्या घरी पाहणी करणार आहे. शेगडी हिटर ज्यांच्या घरात आढळून येईल त्या ग्राहकाला कमीत कमी वीस ते पंचवीस हजार रुपये दंड आकारण्यात येईल. दंडाची रक्कम वरिष्ठ मार्फत व पोलिस संरक्षणात वसूल केली जाईल. रोज संध्याकाळी पाहणी करून केली जाईन व त्याचे नाव वरिष्ठांना देण्यात येईल. या कारवाईमुळे जे नियमितपणे वीज बिल भरणा-या ग्राहकांमध्ये समाधान निर्माण झाले आहे. अशा धडक कारवाईमुळे कुठेतरी वीज चोरीला आळा बसणार आहे. विजेच्या शेगड्यावर बंदी आणली तर मोठ्या प्रमाणात वीज चोरीस आळा बसेल, असे मतही अनेकांनी व्यक्त केले.
२०० लिटरच्या बॅरेलला बसवले हिटर
नांदुरघाटमध्ये टँकरद्वारे पाणी आहे. आम्ही जेव्हा गावात कारवाई करत होतो, त्यावेळी बहूतांश घरात २०० लिटर बॅरलेला हिटर बसवले आहे. संध्याकाळी सातपासून हीटर रात्रभर चालू असते.
या पाहणीत ८० टक्के विद्युत शेगड्या आढळून आल्या, त्यापैकी बहुतांश जप्त करण्यात आल्या आहेत. यापुढे घरात हिटर व शेगडी निदर्शनास आली तर २० ते २५ हजार रुपये दंड आकारला जाईल. त्यांच्याविरुद्ध मोठ्या कारवाया करु.
रीतसर वीज कनेक्शन घ्या व बिल भरणा करा. आम्ही २४ तास वीजपुरवठा करण्याचे काम करीत आहोत.
गावातील अनधिकृत हिटर व शेगडी मुळे महिन्याला नांदुर घाटचा ट्रांसफार्मर जळत आहे. त्याचा वीजपुरवठ्यावर परिणाम होत असल्याची माहिती केजचे मुख्य अभियंता राजेश आंबेकर यांनी दिली.

Web Title: Meters in the dark, figures in the light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.