फिनिक्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थी, पालकांचा सत्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:27 IST2021-07-25T04:27:48+5:302021-07-25T04:27:48+5:30

फिनिक्स शाळेतील एकूण १८ विद्यार्थी दहावी परीक्षेस बसले होते. यापैकी अबोली रामदास बनसोडे, धनश्री उत्तम पठाडे आणि रिया किशोर ...

Meritorious students, parents felicitated at Phoenix International English School | फिनिक्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थी, पालकांचा सत्कार

फिनिक्स इंटरनॅशनल इंग्लिश स्कूलमध्ये गुणवंत विद्यार्थी, पालकांचा सत्कार

फिनिक्स शाळेतील एकूण १८ विद्यार्थी दहावी परीक्षेस बसले होते. यापैकी अबोली रामदास बनसोडे, धनश्री उत्तम पठाडे आणि रिया किशोर जांभळे या तीन विद्यार्थिनींनी १०० टक्के गुण मिळवून तालुक्यात इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून पहिला येण्याचा मान मिळविला, तर धनश्री शेखर मुथा (९९ टक्के), अंशा असद शेख (९८.६० टक्के), प्रतीक्षा प्रमोद गळगटे (९८.६०), प्रेरणा किरण मेहेर (९८.९८), प्रणिता रामकिसन गिते (९४.२०), अरजान बागवान (९३.६०), आवेज शेख (९३), अभिनंदन मेहेर (९२.४०), विकास आबाजी लटपटे (९०.८०) या नऊ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्तीचे गुण मिळविले आहेत.

शाळेतील विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल आष्टी पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक योगेश कोरडे यांच्याहस्ते व प्राचार्य नागसेन कांबळे, संस्थेच्या अध्यक्षा सीमा वालेवाडीकर यांच्या उपस्थितीत गुणवंत विद्यार्थी व पालकांचा सत्कार करण्यात आला. दहावीनंतरची शैक्षणिक आव्हाने कशी पेलावीत याबद्दल कोरडे यांनी मार्गदर्शन केले. प्राचार्य कांबळे यांनी कोरोना कालावधीतही चिकाटी ठेवून विद्यार्थ्यांनी ध्येय साध्य करावे, असे आवाहन केले. यावेळी विलास कांबळे, शेख, निंभोरे, गर्जे, आफिया सय्यद, जुलेखा खान, सागर निकाळजे, गायकवाड, शिल्पा शेकडे, पल्लवी दाणी, शिल्पा सदावर्ते, छाया राऊत, नीता चव्हाण, मोरे आदी शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. नंदिनी कांबळे हिने सूत्रसंचालन करून आभार मानले.

240721\img-20210724-wa0230_14.jpg

Web Title: Meritorious students, parents felicitated at Phoenix International English School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.