घाटनांदूर प्राथमिक आरोग्य केंद्रात केंद्रीय पथकासह जिल्हाधिकाऱ्यांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:33 IST2021-04-10T04:33:29+5:302021-04-10T04:33:29+5:30
जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यात दाखल झालेले केंद्रीय पथक ९ एप्रिल रोजी घाटनांदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची तपासणी ...

घाटनांदूर प्राथमिक आरोग्य केंद्रात केंद्रीय पथकासह जिल्हाधिकाऱ्यांची भेट
जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी जिल्ह्यात दाखल झालेले केंद्रीय पथक ९ एप्रिल रोजी घाटनांदूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची तपासणी करण्यासाठी दाखल झाले होते.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून बीड जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी डॉ. रक्षा कुंडल आणि डॉ. अरविंद सिंह कुशावह यांचे पथक गुरुवारी बीड जिल्ह्यात दाखल झाले होते. पहिला दिवस बीड जिल्हा रुग्णालयाच्या आढाव्या नंतर चार दिवस जिल्ह्यातील विविध ठिकाणच्या कोरोना परिस्थितीचा हे पथक आढावा घेणार आहे.
याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी या पथकाने जिल्हाधिकारी रविंद्र जगताप यांच्यासह घाटनांदूर येथिल प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट देऊन कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला.
या आढाव्या दरम्यान प्रा. आ. केंद्रामार्फत केल्या जाणाऱ्या कोविड -१९ लसीकरण कक्ष तसेच रॅपिड अँटीजन टेस्ट कक्षाची तपासणी करून समाधान व्यक्त केले; तर प्रा. आ. केंद्रातील स्वच्छतेचे कौतुकही केले.
येथील प्रा. आ. केंद्र हे घाटनांदूरसह परिसरातील २८ गावांतील ४५ हजार नागरिकांना आरोग्य सेवा पुरवत आहे. मार्च महिन्यापासून आठवड्यातील दोन दिवस कोविड -१९ चे लसीकरण येथील आरोग्य केंद्रात सुरू आहे. आजपर्यंत याचा १४६८ नागरिकांनी लाभ घेतला आहे. तसेच जानेवारी ते एप्रिल दरम्यान घेण्यात आलेल्या एकूण रॅपिड अँटीजन टेस्ट मध्ये ३१९ पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
यावेळी केंद्रीय आढावा पथकातील डॉ. रक्षा कुंडल, डॉ. अरविंदसिंह कुशावह, यांच्यासह जिल्हाधिकारी जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी अजित कुंभार,अप्पर जिल्हाधिकारी मंजूषा मिसकर,उपजिल्हाधिकारी शरद झाडके, आरोग्य उपसंचालक डॉ माले, अंबाजोगाई पं. स. चे गटविकास अधिकारी डॉ संदीप घोणसीकर, तालुका आरोग्य अधिकारी बालासाहेब लोमटे, विस्तार अधिकारी ए. एस. पवार, ग्रामविकास अधिकारी महेश फड, तलाठी अर्चना चव्हाण, प्रा. आ. केंद्राचे डॉ. विलास घोळवे, डॉ. मुंडे, ज्ञानोबा जाधव, नेताजी देशमुख, सुभाष चव्हाण, आशा सुपरवायजर वीर व आशा कर्मचारी आदि उपस्थित होते.
सर्वत्रच कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने बेड कमी पडत असल्यामुळे घाटनांदूर येथे कोविड सेंटर उघडता येईल का?याची चाचपणी घेण्यात आली .
जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अजित कुंभार यांनी त्रुटी व सुधारणे संदर्भात खडे बोल सुनावले .
===Photopath===
090421\narshingh suryvanshi_img-20210409-wa0011_14.jpg
===Caption===
घाटनांदूर प्राथमिक आरोग्य केंद्रात केंद्रीय पथकाने भेट दिली.