घाटनांदूर आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:23 IST2021-06-20T04:23:00+5:302021-06-20T04:23:00+5:30
घाटनांदूर : संपूर्ण जिल्ह्यात सर्वात जास्त ओपीडी असलेल्या घाटनांदूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास घोळवे यांचा ...

घाटनांदूर आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सत्कार
घाटनांदूर : संपूर्ण जिल्ह्यात सर्वात जास्त ओपीडी असलेल्या घाटनांदूर प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास घोळवे यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्या सिरसाट यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. डी. यू. मुंडे यांची बदली २० ऑगस्ट २०२० रोजी धर्मापुरी येथे झाली. त्यानंतर येथे कार्यरत असलेले दुसरे वैद्यकीय अधिकारी डॉ. विलास घोळवे यांनी तब्बल दहा महिने एक हाती खिंड लढवित २४ तास आरोग्य सेवा उपलब्ध करीत रुग्णसेवा केली. कोरोनाच्या गंभीर साथीच्या काळात तसेच वसुंधरा कोविड सेंटर येथे सेवा बजावत उत्कृष्ट कार्य केले. इतर वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचाऱ्यांशी समन्वय राखत कोविड लसीकरणात तालुक्यात अव्वल नंबर पटकावला. याची दखल घेत बीड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवकन्या सिरसाट यांनी स्वतः आरोग्य केंद्रात जाऊन सत्कार करून प्रोत्साहन दिले. यावेळी राकाँचे नेते शिवाजीराव सिरसाट, अंबाजोगाईचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे, धारूरच्या तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. स्वाती डिकले आदी उपस्थित होते.
आरोग्य केंद्राचा दर्जा वाढविणार
प्राथमिक आरोग्य केंद्राला कुठलीही अडचण येऊ देणार नसल्याचे सांगत लवकरच केंद्राची दर्जा वाढ करून ट्रामा केअर सेंटर सुरू करण्यासाठी प्रयत्न करत असल्याचे जि. प. अध्यक्ष शिवकन्या सिरसाट म्हणाल्या. या प्रसंगी प्रा. आ. केंद्राचे सुपरवायझर एस. के. गोरे यांच्यासह सर्व आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका उपस्थित होत्या.
===Photopath===
190621\19bed_8_19062021_14.jpg