एम.डी.सिंह यांची बदली; आस्तिककुमार पांडेय बीडचे नवे जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2019 18:04 IST2019-02-20T18:02:18+5:302019-02-20T18:04:47+5:30

एम.डी. सिंह यांची माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे संचालक पदावर बदली झाली आहे.

M.D. Sinh transfers; New Collector of Beed will be Astikvakumar Pandey | एम.डी.सिंह यांची बदली; आस्तिककुमार पांडेय बीडचे नवे जिल्हाधिकारी

एम.डी.सिंह यांची बदली; आस्तिककुमार पांडेय बीडचे नवे जिल्हाधिकारी

ठळक मुद्देनरेंद्र मोदी यांनी केला होता सिंह यांचा गौरव पंधानमंत्री पीक विमा योजनेत जिल्हा देशात प्रथम आणण्याचे श्रेय  

बीड : येथील जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांची आज बदली झाली असून, त्यांच्या जागी अकोल्याचे जिल्हाधिकारी डॉ.आस्तिककुमार पांडेय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

आज राज्यातील विविध विभागातील भारतीय प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या यामध्ये बीडचे जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांची माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचे संचालक पदावर बदली झाली. त्यांच्या जागेवर अकोला येथील जिल्हाधिकारी डॉ.आस्तिककुमार पांडेय यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना तात्काळ बीड येथे रुजू होण्याचे आदेश अपर मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी दिले आहेत. 

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थिती, राजकीय दबाव व प्रशासनातील अधिकाऱ्यांची रिक्त पदे अशा कठीण परिस्थितीमध्ये देखील एम.डी.सिंह यांनी जिल्ह्यातील नागरिकांना योग्य सुविधा मिळाव्यात यासाठी नियोजबद्ध कामकाज करण्याचा नेहमी प्रयत्न केला. विशेष म्हणजे प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना सहभागी करुन घेतले होते, या योजनेचा शेतकऱ्यांना फायदा देखील झाला होता. तसेच या योजनेत देशपातळीवर बीड जिल्ह्याला प्रथम क्रमांक मिळाला होता. या कार्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जिल्हाधिकारी एम.डी.सिंह यांचा गौरव केला होता.

Web Title: M.D. Sinh transfers; New Collector of Beed will be Astikvakumar Pandey