नगराध्यक्ष डॉ. हजारींच्या अडचणीत वाढ, न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:40 IST2021-09-04T04:40:35+5:302021-09-04T04:40:35+5:30
सोनोग्राफीसाठी आलेल्या १९ वर्षीय गर्भवती महिलेशी गैरवर्तन केल्याचा प्रकार ३१ ऑगस्ट रोजी डॉ. हजारी यांच्या हॉस्पिटलमध्ये घडला होता. पीडितेच्या ...

नगराध्यक्ष डॉ. हजारींच्या अडचणीत वाढ, न्यायालयाने फेटाळला जामीन अर्ज
सोनोग्राफीसाठी आलेल्या १९ वर्षीय गर्भवती महिलेशी गैरवर्तन केल्याचा प्रकार ३१ ऑगस्ट रोजी डॉ. हजारी यांच्या हॉस्पिटलमध्ये घडला होता. पीडितेच्या तक्रारीवरून त्याच रात्री धारूरचे नगराध्यक्ष डॉ. स्वरूपसिंह हजारी यांच्यावर विनयभंग, ॲट्रॉसिटीनुसार गुन्हा नोंद केला होता. दरम्यान, डॉ. हजारी यांनी जामिनासाठी माजलगाव सत्र न्यायालयात वकिलामार्फत अर्ज केला. दुसरे सत्र न्या. एस. पी. देशमुख यांनी त्यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे डॉ. हजारी यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
.....
पीडितेवर दबाव, अटकेची मागणी
डॉ. हजारी यांनी पीडितेवर दबाव टाकून तिच्याकडून जामिनासाठी पूरक शपथपत्र घेतले. मात्र, न्यायालयाने डॉ. हजारी यांचा जामीन अर्ज फेटाळून लावला. पीडितेवर दबाव टाकून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या डॉ. हजारींना तातडीने अटक करा, अशी मागणी बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक बाबूराव पोटभरे यांनी केली.
....