माथेफिरूने केला वृद्ध शेतकऱ्याचा डोक्यात दगड घालून खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 20:00 IST2021-02-08T19:59:35+5:302021-02-08T20:00:00+5:30

आरोपी हा औरंगपूर येथील २७ वर्षीय तरुण असून तो निर्वस्त्र अवस्थेत तिथे फिरत होता.

Mathefiru killed the old man by throwing stones at his head | माथेफिरूने केला वृद्ध शेतकऱ्याचा डोक्यात दगड घालून खून

माथेफिरूने केला वृद्ध शेतकऱ्याचा डोक्यात दगड घालून खून

ठळक मुद्दे शेजारील शेतकऱ्यांनी आरोपीस पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

केज : सारणी (आ) गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील एका शेतातील  ९० वर्षीय वृद्धाचा एका माथेफिरूने डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना सोमवारी ( दि.८ ) दुपारी ४ वाजेच्या सुमारास घडली. शेतकऱ्यांनी माथेफिरू आरोपीस पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले आहे.

केज तालुक्यातील कुंबेफळ येथील ९० वर्षीय वृद्ध शेतकरी बाबुराव जाडकर हे त्यांच्या सारणी (आ ) रस्त्याजवळील शेतात गेले होते. दुपारी शेतात एकटे असताना अचानक निर्वस्त्र अवस्थेतील एका माथेफिरूने त्यांच्यावर हल्ला केला. दगडाने त्यांच्यावर वार करत त्याने वृद्धाला गंभीर जखमी केले. यातच त्यांचा मृत्यू झाला. यानंतर शेजारील शेतकऱ्यांनी आरोपीस पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. माथेफिरू हा औरंगपूर येथील २७ वर्षीय तरुण असून तो निर्वस्त्र अवस्थेत तिथे फिरत होता. सतीश जोगदंड असे आरोपीचे नाव असून त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  सहायक पोलीस निरीक्षक आनंद झोटे यांनी घटनास्थळी पाहणी केली. 
 

Web Title: Mathefiru killed the old man by throwing stones at his head