शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

मातंग आरक्षण : ५० तासानंतर संजयवर अंत्यसंस्कार; पालकमंत्री, जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2019 7:56 PM

सकारात्मक विचार करण्याबद्दल लेखी आश्वासन देताच आंदोलन मागे घेण्यात आले.

केज (बीड ) : मातंग समाजाला आरक्षण द्यावे, या मागणीसाठी संजय ताकतोडे (रा.साळेगाव ता.केज) या तरूणाने जलसमाधी घेतली होती. त्यानंतर नातेवाईकांनी मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरू केले. अखेर पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांनी मदत जाहीर करून मागण्याबाबत सकारात्मक विचार करण्याबद्दल लेखी आश्वासन देताच आंदोलन मागे घेण्यात आले. तब्बल ५० तासानंतर  संजयच्या पार्थिवावर पोलीस बंदोबस्तात गुरूवारी दुपारी अंत्यसंस्कार झाले.  

केज तालुक्यातील साळेगाव येथील संजय ताकतोडे याने मातंग समाजास एससी प्रवर्गातील १३ टक्के आरक्षण देण्याच्या मागणीसाठी पाली येथील बिंदुसरा धरणात जलसमाधी घेत आत्महत्या केल्याची घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली होती. त्यानंतर त्याचे शवविच्छेदन इन कॅमेरा करावे, अशी मागणी नातेवाईकांनी केली. त्यासाठी संजयचा मृतदेह औरंगाबादच्या घाटी रूग्णालयात नेला. शवविच्छेदन झाल्यानंतरही नातेवाईकांनी अचानक औरंगाबादमध्ये ठिय्या आंदोलन केले. पोलिसांच्या मध्यस्थीने आंदोलन मागे घेत शव बुधवारी रात्री साळेगाव येथे आणण्यात आले. यावेळे संजयच्या कुटुंबाचे पुनर्वसन करावे, कुटुंबाला पंचवीस लाख रुपयांची आर्थिक मदत करावी, कुटुंबातील एका सदस्याला शासकीय नौकरीस घ्यावे, मुंबई विद्यापीठास अण्णाभाऊ साठे यांचे नाव देण्यात यावे यासारख्या विविध मागण्यांसाठी साळेगावमध्ये ठिय्या आंदोलन सुरू केले.

मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यात अंत्यसंस्कार न करण्याचा निर्णय नातेवाईकांनी घेतला. त्यानंतर बुधवारी रात्री आ. प्रा.संगीता ठोंबरे यांनी मध्यस्थी करून पालकमंत्री पंकजा मुंडे यांना या बाबतीत माहिती दिली. तरीही आंदोलक शांत झाले नाहीत. जोपर्यंत पालकमंत्री साळेगाव येथे येऊन लेखी आश्वासन देत नाहीत, तो पर्यंत अंत्यसंस्कार न करण्याच्या निर्णयावर ते ठाम होते.

गुरूवारी पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी संजयच्या कुटुंबास लेखी पत्र देत शासकीय मदतनिधीतुन दहा लाख रुपये व गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानच्या वतीने दोन लाख रुपयाची आर्थिक मदत जाहिर केली. तसेच इतर मागण्यासंदर्भात आपण स्वता: लक्ष घालुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या बाबतीत लवकरच बैठक लावणार असल्याचे लेखी आश्वासन दिले. तसेच जिल्हाधिकारी यांनीही शासकीय मदतनिधीतुन दहा लक्ष रुपये मदत जाहिर केल्याचे लेखी पत्र दिल्यानंतर गुरुवारी सायंकाळी पाच वाजता ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले. 

यावेळी प्रा.संगीता ठोंबरे,  समाजकल्याण सभापती संतोष हांगे, प्रा. लक्ष्मण ढोबळे, रमेश आडसकर, राजकिशोर मोदी, लहुजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष खंदारे, गौतम बचुटे,  अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे, पोलीस उपअधीक्षक अशोक आम्ले,  उपविभागीय अधिकारी शोभादेवी जाधव, नायब तहसीलदार सचिन देशपांडे, पोलीस निरीक्षक सुनिल बिर्ला आदींची उपस्थिती होती.

साळेगावात कडकडीत बंदसंजय ताकतोडे यांनी जलसमाधी घेऊन आत्महत्या केल्यानंतर लहुजी सेनेच्या वतीने विविध मागण्यासंदर्भात ठिय्या आंदोलन करत अंत्यविधी करण्यास नकार दिल्याने साळेगावमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. गुरुवारी साळेगाव येथील आठवडी बाजार असतानाही बाजार तळावर शुकशुकाट दिसुन आला. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, म्हणून प्रशासनाने साळेगावसह आ.ठोंबरे यांच्या निवासस्थानी पोलीस बंदोबस्त तैनात केला होता.

शेळी पालनासाठी ५० हजार रूपयेसंजयच्या कुटूंबाला शेळी पालनासाठी समाजकल्याण विभागाकडून ५० हजार रूपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. सभापती संतोष हंगे यांनी ही घोषणा केली.

टॅग्स :reservationआरक्षणBeedबीडSuicideआत्महत्याBeed collector officeजिल्हाधिकारी कार्यालय बीडPankaja Mundeपंकजा मुंडे