‘वैद्यनाथ’च्या पायथ्याशी मुलाला सोडून माता फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 23:41 IST2018-12-03T23:41:20+5:302018-12-03T23:41:42+5:30

साधारण एक महिन्याच्या मुलाला वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी सोडून माता फरार झाली. ही घटना रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास समोर आली. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात मातेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मुलाची प्रकृती ठणठणीत आहे.

Mata absconding, leaving the child at the foot of Vaidyanath | ‘वैद्यनाथ’च्या पायथ्याशी मुलाला सोडून माता फरार

‘वैद्यनाथ’च्या पायथ्याशी मुलाला सोडून माता फरार

लोकमत न्यूज नेटवर्क
परळी : साधारण एक महिन्याच्या मुलाला वैद्यनाथ मंदिराच्या पायथ्याशी सोडून माता फरार झाली. ही घटना रविवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास समोर आली. याप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात मातेविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. मुलाची प्रकृती ठणठणीत आहे.
वैद्यनाथ देवस्थानच्या पायथ्याशी शनि मंदिर आहे. या मंदिराचे बांधकाम सध्या सुरु आहे. त्यामुळे येथे रात्रीच्या वेळी कोणीही नसते. हीच संधी साधून अज्ञात मातेने साधारण एक महिन्याचा मुलगा या ठिकाणी आणून सोडला अन् पळ काढला. हा प्रकार दर्शनास येणाऱ्या भाविक व नागरिकांना समजला. त्यांनी तात्काळ शहर पोलिसांना माहिती दिली. पो. ह. समाधान भाजीभाकरे यांनी धाव घेत मुलाला उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. उपचारानंतर त्याला अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या त्याची प्रकृती ठणठणीत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात मातेविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. तपास पो. ह. घुमरे हे करीत आहेत.

Web Title: Mata absconding, leaving the child at the foot of Vaidyanath