रोहित्र दुरूस्ती केंद्रास भीषण आग; दैवबलवत्तर म्हणून चार कामगार बचावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2021 01:08 PM2021-10-21T13:08:15+5:302021-10-21T13:12:04+5:30

प्रसंगावधान राखून चारही कामगार केंद्रातून वेळीच बाहेर पडले. यामुळे मोठा अनर्थ टळला.

Massive fire at Transformer repair center near Kada; Four workers were rescued | रोहित्र दुरूस्ती केंद्रास भीषण आग; दैवबलवत्तर म्हणून चार कामगार बचावले

रोहित्र दुरूस्ती केंद्रास भीषण आग; दैवबलवत्तर म्हणून चार कामगार बचावले

Next
ठळक मुद्देनगर बीड राष्ट्रीय महामार्गावरील कडा येथील घटनाया आगीत ३० लाखांचे साहित्य जळुन खाक

- नितीन कांबळे 
कडा ( बीड ) : सांगळे गोठा येथील एका रोहित्र दुरुस्ती केंद्रात आज पहाटे चार वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. दैवबलवत्तर म्हणून आगीत केंद्रात असणारे चार कामगार बचावले आहेत. दरम्यान, आगीत जवळपास ३० लाख रूपये किंमतीचे साहित्य जळून खाक झाल्याचा अंदाज आहे. 

आष्टी तालुक्यातील कडा येथील हरिश्चंद्र सांगळे यांनी दोन महिन्यांपूर्वी कष्टातून नगर बीड राष्ट्रीय महामार्गावरील सांगळे गोठा येथे ट्रान्सफॉर्मर दुरूस्ती केंद्र सुरु केले आहे. बुधवारी रात्री केंद्रात ४ कामगार काम पूर्ण करून आतमध्ये झोपी गेले होते. अचानक आज पहाटे चार वाजेच्या सुमारास केंद्रात शाॅटसर्किट झाला आणि भीषण आग लागली. काही क्षणात आगीने रौद्ररूप धारण केले. माहिती मिळतच ग्रामस्थांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने अग्निशमन दल दाखल झाले. त्यांनी मोठे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली.  

दरम्यान, प्रसंगावधान राखून चारही कामगार केंद्रातून वेळीच बाहेर पडले. यामुळे मोठा अनर्थ टळला. या भीषण आगीत इलेक्ट्रिकल, ट्रान्सफॉर्मरचे अंदाजे ३० लाखाचे सर्व साहित्य जळून खाक झाले. रघुनाथ कर्डिले, दादा थोरवे, बाळासाहेब कर्डिले, बाळासाहेब थोरवे, नानाभाऊ वाडेकर, हरिचंद्र सांगळे आदी ग्रामस्थांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. तसेच पोलिस शिपाई मंगेश मिसाळ, बंडु दुधाळ यांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन मदतकार्य केले. 

Web Title: Massive fire at Transformer repair center near Kada; Four workers were rescued

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Beedfireबीडआग