शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण; सीआयडीची ९ पथके, दीडशेवर पोलिस, तरी आरोपी सापडेनात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 06:31 IST

बीड जिल्ह्यातील मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अनुषंगाने वाल्मीक कराड, सुदर्शन घुलेसह चार फरार आरोपींच्या शोधासाठी सीआयडीची नऊ पथके आणि १५० पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले आहेत. देशभर शोध सुरू असल्याचा दावा केला जात आहे. परंतु २२ दिवस उलटूनही हे आरोपी सापडलेले नाहीत. 

बीड/पुणे : मस्साजोग गावच्या सरपंचांची हत्या तसेच दोन कोटी रुपयांची खंडणी याप्रकरणी फरार असलेला आरोपी वाल्मीक कराड पुण्यात रविवारी रात्री उशिरा शरण आल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, कराड याचा शोध घेण्यात येत असून, तो शरण आलेला नाही, अथवा अद्याप त्याला अटकदेखील करण्यात आली नसल्याची माहिती सीआयडीच्या सूत्रांनी दिली. तसेच पुण्यात कराड याच्यावर हे गुन्हे दाखल नसल्याने पुण्याचा तसा संबंध येत नसल्याचेदेखील सूत्रांनी सांगितले.

बीड जिल्ह्यातील मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अनुषंगाने वाल्मीक कराड, सुदर्शन घुलेसह चार फरार आरोपींच्या शोधासाठी सीआयडीची नऊ पथके आणि १५० पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले आहेत. देशभर शोध सुरू असल्याचा दावा केला जात आहे. परंतु २२ दिवस उलटूनही हे आरोपी सापडलेले नाहीत. 

फरार आरोपींच्या मालमत्ता जप्तीसाठी सीआयडीचे पत्र- सरपंच हत्या प्रकरणात सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे आणि सुधीर सांगळे हे तिघे जण फरार आहेत. तर दोन कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात वाल्मीक कराड मोकाट आहे. - त्यांच्या शोधासाठी सीआयडीचे पथक धावपळ करत आहेत. परंतु आरोपी सापडत नसल्याने विरोधकांसह सत्ताधारीही आक्रमक झाले आहेत. - त्यामुळेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याचे आदेश सीआयडीला दिले होते. - त्याप्रमाणे त्यांनी न्यायालयात पत्र देऊन जप्तीची कार्यवाही सुरू केली आहे. त्यासाठी महसूल व उपनिबंधक कार्यालयाला पत्रही दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

काय म्हणाले धनंजय देशमुख?तपासाचा आढावा घेण्यासाठी सीआयडीची भेट घेतली. जास्तवेळ बोलणे झाले नाही. परंतु मंगळवारी आणखी सविस्तर बोलणार आहोत. तसेच दोन दिवसांत आरोपी अटक करू, असा विश्वास सीआयडीने दिले आहे. सीडीआरबाबतही विचारले; परंतु उद्या बोलतो, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

माहिती घेतली...मृत सरपंच संतोष देशमुख यांचे भाऊ धनंजय देशमुख यांनी तपासाची माहिती घेण्यासाठी सोमवारी दुपारी सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेतली. पुरवणी जबाब, न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या चर्चांवर आपण मंगळवारी बोलणार असल्याचेही देशमुख यांनी माध्यमांना सांगितले.

...तरीही शस्त्र परवाना अन् दोन पोलिस बॉडीगार्डवाल्मीक कराडवर तब्बल १५ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. असे असतानाही त्याच्याकडे शस्त्र परवाना होता. एवढेच नव्हे तर गुन्हा दाखल होईपर्यंत दोन पोलिस बॉडीगार्डही होते. त्यामुळे पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. तर दुसऱ्या बाजूला पोलिसांनी यादी पत्र दिल्यानंतरही जिल्हाधिकाऱ्यांनी त्यावर कारवाई केली नाही.

अंजली दमानिया यांनी दिलेल्या माहितीची खात्री केली. परंतु तीन मृतदेह सापडल्याची माहिती खोटी असल्याचे चौकशीतून समोर आले. सीआयडीकडून तपासाच्या अनुषंगाने जी माहिती विचारतील, ती देत आहोत.- नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक, बीड 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसDeathमृत्यू