- मधुकर सिरसट केज : मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरतेने झालेली हत्या ही राज्याची प्रतिमा कलंकित करणारी घटन आहे. केज पोलिसांनी अशोक सोनवणे यांची ॲट्रॉसिटीची फिर्याद नोंद केली असती तर ही घटना घडलीच नसती. पोलिसांनी कोणाच्याही दबावाखाली येऊन काम करू नये, असे आवाहन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. आज, सोमवारी सकाळी अकरा वाजता मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केल्यानंतर गावकरी व प्रसार माध्यमांसोबत मंत्री आठवले यांनी संवाद साधला.
ही घटना अत्यंत क्रूर आणि गंभीर असून देशमुख कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. देशमुख कुटुंबियांना न्याय मिळेपर्यंत रिपाई त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे, असे आठवले देशमुख कुटुंबास सांत्वन करताना म्हणाले. सीआयडीचा तपास योग्य दिशेने चालू आहे. मात्र, फरार आरोपिंची संपत्ती व बँकेचे खाते जप्त करून चालणार नाही. जलद गतीने तपास करून त्यांना तात्काळ अटक करावे. यासाठी आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेट घेणार असल्याचे मंत्री आठवले यांनी यावेळी सांगितले.
यावेळी युवा रिपाईचे प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, बाबुराव कदम, मिलिंद शेळके, दीपक कांबळे राजू जोगदंड, दिपक कांबळे, महावीर सोनवणे, अशोक साळवे, किशोर कांडेकर, अविनाश जावळे, किसन तांगडे, मझर खान, सुरेश माने, रविराज माळाळे, मायाताई मिसळे, राणी गायकवाड, गोवर्धन वाघमारे, उत्तम आप्पा मस्के, बापू पवार, सादेक कुरेशी, भाई उजगरे, महादेव उजगरे, अरुण निकाळजे, अरुण भालेराव, दीपक कांबळे, धोंडीराम सिरसट, प्रमोद दासुद, सुभाष तांगडे, संदीपान डोंगरे, राहुल सरवदे, अविनाश जोगदंड, सतीश शिनगारे, प्रभाकर चांदणे, विलास जोगदंड, शाम विर, नागेश दुबळे, भाऊसाहेब दळवी, रतन वाघमारे, संभाजी गायकवाड, ईश्वर सोनवणे, निलेश ढोबळे, राजेश सोनवणे, अक्षय कोकाटे, धम्मा पारवेकर आणि दिलीप बनसोडे, रवी जोगदंड, गौतम बचुटे, सूरज काळे, हरेंद्र तूपारे, प्रशांत हजारे, हरीश गायकवाड, दादाराव धेंडे, विनोद शिंदे, रोहित कांबळे, रोहित बचुटे आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
देशमुख कुटुंबियांचे अद्याप जवाब नोंदविले नाहीतमस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची दिवसाढवळ्या अपहरण करून क्रूरतेने हत्या करण्यात आली. या घटनेला २२ दिवस झाले. तरीही त्यांच्या कुटुंबियांचे पोलीस किंवा सीआयडी, यांनी अद्याप जवाब नोंदविले नाहीत. याबद्दल ग्रामस्थांनी नापसंती व्यक्त केली.